Indian Navy: आयएनएस वागशीर जलावतरणासाठी सज्ज - Saam TV
देश विदेश

Indian Navy: आयएनएस वागशीर जलावतरणासाठी सज्ज

माझगाव डॉकने निर्माण केलेली फ्रेंच स्कॉर्पिओ बनावटीची पाणबुडी ‘वागशीर’ ही पुढील आठवड्यात जलावतरणास सज्ज झाली आहे

साम टिव्ही

मुंबई : माझगाव डॉकने निर्माण केलेली फ्रेंच स्कॉर्पिओ बनावटीची पाणबुडी ‘वागशीर’ ही पुढील आठवड्यात जलावतरणास सज्ज झाली आहे. माझगाव डॉकनिर्मित युद्धनौका व पाणबुड्यांमध्ये जास्तीत जास्त स्वदेशी भाग वापरण्यात येत असल्याची माहिती डॉकचे अध्यक्ष निवृत्त व्हाईस ॲडमिरल नारायण प्रसाद यांनी दिली आहे. (Indian Navy New submarine INS Vagsheer ready for launch)

या पाणबुडीची निर्मिती पूर्ण झाली असून लवकरच तिचे जलावतरण झाल्यावर तिच्या वर्ष-दीड वर्ष बंदरात, तसेच खोल समुद्रात चाचण्या होतील. त्यानंतरच तिचा समावेश नौदल ताफ्यात केला जाईल. या पाणबुडीतील चाळीस टक्के भाग स्वदेशी असून यापुढील पाणबुड्यांमध्ये हे प्रमाण साठ ते सत्तर टक्के एवढे नेण्याचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

जागतिक विक्रम हुकला
माझगाव डॉकमध्ये युद्धनौका व पाणबुड्यांची निर्मिती वेळेत सुरू आहे. मात्र, मागील वर्षी तीन युद्धनौका व पाणबुड्यांचे जलावतरण एकाचवेळी करण्याचा विश्वविक्रम कोरोना परिस्थितीमुळे हुकला. तरीही या वर्षअखेरीस एकाच दिवशी निदान एकाच आठवड्यात दोन युद्धनौका व पाणबुड्यांचे जलावतरण करण्याचा प्रयत्न करू, असेही नारायण प्रसाद म्हणाले.

लांब पल्ल्याचे ब्राह्मोस
या वर्षी नौदलाकडे सुपूर्द होणाऱ्या एका अत्याधुनिक विनाशिकेवर जादा लांब पल्ल्याचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र बसविले जाईल. नौकेच्या चाचण्या करताना या क्षेपणास्त्राच्याही चाचण्या केल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT