हवामान खात्याने महाराष्ट्रासह १६ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला.
पुढील दोन दिवसांत धुव्वाधार पावसाची शक्यता.
मध्य भारत, पश्चिम व दक्षिण भारतातील काही राज्यांना विशेष इशारा.
नागरिकांना सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन.
देशाच्या विविध भागात मान्सून सक्रिय असून भारतीय हवामान विभागाने पुढील ५ दिवसांचा अंदाज वर्तवलाय. पाच दिवस अनेक १६ राज्यात तुफान पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीजवळ आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.
हे कमी दाबाचा पट्टा पुढील दोन दिवसांत आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीवादळ वाऱ्यांच्या प्रभावामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलाय. (IMD Forecast: Widespread Rainfall to Lash Maharashtra and Other States)
आज जम्मू आणि पश्चिम पंजाबमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवस उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर महाराष्ट्रात उद्या आणि परवा धुव्वाधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
२६ ऑगस्ट रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडणार आहे. २८-२९ ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये आणि २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान पूर्व राजस्थानमध्ये अति मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलाय. या काळात वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. ओडिशामध्ये २६ ऑगस्ट म्हणजे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
छत्तीसगड, ओडिशा, विदर्भ, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशात पुढील पाच ते सात दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. छत्तीसगडमध्ये २६-२८ ऑगस्ट रोजी आणि ओडिशामध्ये २७ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. पश्चिम भारतातील गुजरात, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील घाट भागात २७-२८ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडेल.
दक्षिण आणि ईशान्य भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. आंध्र प्रदेशातही धुव्वाधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस होईल. ईशान्येकडील आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.