A steaming cup of traditional Indian Masala Chai that has captured the world’s top spot in global tea rankings. saam tv
देश विदेश

भारतीय 'मसाला चहा' बनला जगज्जेता! चीनचा चहा फिका पडला

Indian Masala Chai Ranked No.1 In The World By TasteAtlas: प्रत्येक भारतीयाच्या दिलाची धडकन असलेला आपला 'मसाला चहा' आता अधिकृतपणे 'जगज्जेता' ठरलाय! आपल्या चहाला नंबऱ वन कसं ठरवण्यात आलयं ? जर आपला मसाला चहा एक नंबरवर असेल तर मग दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कोणता चहा आहे? सविस्तर जाणून घ्या या स्पेशल रिपोर्टमधून..

Saam Tv

शामल भंडारे, साम टीव्ही

चहाची वेळ नसली तरी वेळेला चहा मात्र नक्की हवा....जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं हे पेय. प्रसिद्ध ग्लोबल फूड गाईड 'टेस्ट ॲटलास'ने (TasteAtlas) जाहीर केलेल्या जगातील 'टॉप १००' चहाच्या यादीत, भारतीय मसाला चहाला जगात पहिली पसंती मिळालीय...होय, प्रत्येक भारतीयाच्या दिलाची धडकन असलेला आपला 'मसाला चहा' आता अधिकृतपणे 'जगज्जेता' ठरलाय...

या जागतिक स्पर्धेत भारताने चहाच्या क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या अनेक देशांना धूळ चारली आहे. चहाच्या या जागतिक महायुद्धात जपानचा प्रसिद्ध 'होजिचा' चहा दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला, तर श्रीलंकेचा 'सीलॉन ब्लॅक टी' तिसऱ्या क्रमांकावर राहिला. इतकेच नव्हे, तर चहाचा उगम मानल्या जाणाऱ्या चीनचा बलाढ्य 'पुएरह' चहा देखील भारताच्या मसाला चहाच्या चवीपुढे पुरता फिका पडला आणि मागे राहिला.

रस्त्यावरील टपरीपासून ते उच्चभ्रू चहा हाउसपर्यंत, चहा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. TasteAtlas च्या यादीत भारतीय चहांचे वैविध्य दिसून येते. मसाला चहातील तिखट-मसाल्यांचा स्वाद, दार्जिलिंग चहातील फुलांचा नाजूक सुगंध, आसाम चहातील ताकद आणि काश्मीरच्या 'गुलाबी नून'चे खारट चव यामुळे भारताच्या चहा संस्कृतीची विविधता जगासमोर आली आहे.

मसाला चाहाला जगात प्रथम क्रमांक मिळाला आहे. मात्र यासोबतच भारतातील इतर चहांनीही उत्कृष्ट स्थान पटकावले आहेत

भारतीय चहा जगात अव्वल!

मसाला चहा - पहिला क्रमांक

दार्जिलिंग चहा - सहावा क्रमांक

आसाम चहा - 13वा क्रमांक

सुलेमानी चहा (केरळम) - 39वा क्रमांक

कांग्रा टी (हिमाचल प्रदेश) - 41वा क्रमांक

नून चहा (जम्मू-काश्मीर) - 43वा क्रमांक

भारतात ‘चाय पे चर्चा’ हा केवळ शब्द नाहीये..,ही एक संस्कृती आहे आणि याच संस्कृतीला तुम्ही कधीही नाकारु शकत नाही. भारतीय चहाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली चव आणि वारसा सिद्ध केला आहे! त्यामुळे आता जगालाही कबूल करावं लागलंय की, खरी चव आणि सुगंध फक्त भारतीय चहामध्येच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT