Anju In Pakistan Saam TV
देश विदेश

Anju In Pakistan: प्रेमासाठी कायपण! प्रियकराची ओढ, विवाहितेने पाकिस्तानच गाठलं, सीमानंतर अंजूची प्रेम कहाणी चर्चेत

Indian Woman In Pakistan: प्रेमासाठी विवाहीत महिलेने थेट पाकिस्तान गाठलं

Ruchika Jadhav

Anju Nasrullah's Love Story:

प्रेमाता आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणतात. याच प्रेमाची ताकद दाखवणारी सीमा हैदर चर्चेत असतानाच आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यामध्ये विवाहित भारतीय महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानात पोहचलीये. (Latest Marathi News)

पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात महिलेने प्रवास केला आहे. भारतातून पाकिस्तानात पोहचल्यावर सुरुवातीला पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं. नंतर आपल्याजवळ असलेली सर्व कागदपत्रे तिने पोलिसांना दाखवली. प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर तिला सोडण्यात आलंय.

अंजू असं या महिलेचं नाव आहे. ३४ वर्षीय अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला. अंजूला दोन मुलं देखील आहेत. लग्नानंतर ती राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहात होती. ती आता पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वाच्या अप्पर दीर ​​जिल्ह्यात राहत आहे. इथे ती आपल्या २९ वर्षीय पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाला भेटायला आलीये.

नसरुल्ला वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची आणि अंजूची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली. महिनाभरापासून ती पाकिस्तानचा प्रवास करत होती. अशी माहिती पीटीआने दिली आहे.

अंजूने घरातून निघताना जयपूरला जात असल्याचं आपल्या पतीला सांगितलं होतं. मी माझ्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी जात आहे असं तिने घरी सांगितलं. अंजूचे पती अरविंद यांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे.

2007 मध्ये अंजू आणि अरविंद यांचे लग्न झाले होते. तेव्हापासून ते एकत्र राहत होते. अंजू आणि तिच्या प्रियकरात खरंच प्रेमाचं नातं आहे की, ते अन्य कोणत्या मोहिमेसाठी एकत्र आलेत याचा तपास पोलिस करत आहेत. अंजू आणि सीमा या दोघींच्या प्रेम काहाणीची सध्या संपूर्ण जगभर चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT