Indian Family Died California Saam TV
देश विदेश

Indian Family Died California: पती-पत्नीसह दोन जुळ्या मुलांचा मृत्यू; भारतीय कुटुंबासोबत कॅलिफोर्नीयात काय घडलं?

Killed Four Family Members: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद सुजीथ हेन्री, त्यांची पत्नी ॲलिस प्रियांका आणि त्यांच्या चार वर्षांच्या दोन जुळ्या मुली, अशी मृतांची ओळख त्यांच्या मित्र परिवाराकडून पटली आहे.

Ruchika Jadhav

America News:

अमेरिकेतून एक थरारक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील ४ जणांचा कॅलिफोर्नियामध्ये राहत्या घरी मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी या सर्वांचे मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरू केलाय. दरम्यान पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद सुजीथ हेन्री, त्यांची पत्नी ॲलिस प्रियांका आणि त्यांची चार वर्षांची दोन जुळी मुलं, अशी मृतांची ओळख त्यांच्या मित्र परिवाराकडून पटली आहे. सदर घटना १२ फ्रेब्रुवारी रोजी सॅन माटेओ येथे घडली. सदर कुटुंबीय केरळहून आले होते, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

राहत्या घरात ४ मृतदेह

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यावर तपास केला तेव्हा अन्य कोणतीही व्यक्ती जबरदस्तीने घरात आली असावी असे जाणवले नाही. मात्र बाथरूममध्ये पोलिसांना एक पिस्तुल सापडले.

हत्या की आत्महत्या

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कौटुंबीक वादातून ही घटना घडली असावी असं म्हटलं जात आहे. साल २०१६ मध्ये या जोडप्याने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. मात्र नंतर त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

त्यामुळे पतीने पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जतोय. मात्र दोन मुलांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास पोलीस अद्याप करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT