Indian Economy Saam Digital
देश विदेश

Indian Economy: भारत २०३० पर्यंत जर्मनी, जपानला टाकणार मागे, जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

Indian Economy: भारत जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला असून २०३० पर्यंत जर्मनी आणि जपानला मागे टाकत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indian Economy

भारत जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला असून २०३० पर्यंत जर्मनी आणि जपानला मागे टाकत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. आयएमएफ, जागतिक बँकेसह जगातील अनेक एजन्सिंकडून सकारात्मक दृष्टिकोण व्यक्त करण्यात आला आहे. एसअँडपी ग्लोबलने जाहिर केलेल्या अहवालात, ही वाढ पुढच्या सात वर्षात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सोमवारी एसअँडपी ग्लोबल इंडीया मॅन्युफॅक्चरिंगने जाहिर केलेल्या अहवालात, २०२१ नंतर २०२२, २०२३ या दोन वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगाने होत असलेली वाढ पहायला मिळाली आहे. २०२३ मध्येही भारत मजबूत वाढीसह प्रगती करत आहे. सध्या भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारताच्या जीडीपीचा आकार २०२३ पर्यंत ७३०० अरब डॉलर होणार होण्याची शक्यता आहे. ही वाढ निरंतर राहण्याची आशा आहे. यामध्ये घरगुती उत्पादनांच्या मागणीचा मोठा असेल. घरगुती उत्पादने ६.३ टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. ही वाढ पाहता २०२४ पर्यंत भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहणार आहे.

जगात सध्या अमेरिका सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून त्यानंतर चीन, जर्मनी आणि जपानचा क्रमांक लागतो. तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या प्रगत देशांपेक्षा मोठा आहे. जगातल्या या मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेत घट होण्याचा अंदाज असताना भारतासाठी मात्र सकारात्मक वातावरण असणार आहे. सध्या अमेरिकेचा जीडीपी २५,००० अरब डॉलर, चीनचा १८,००० अरब डॉलर जीडीपी आहे. त्यानंतर जर्मनी आणि जपानचा क्रमांक लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhimashankar : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भिमाशंकरमध्ये शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि महाआरती | VIDEO

Shravan Somwar 2025: पहिल्याच श्रावणी सोमवारी बनलेत 4 दुर्मिळ योग; 3 राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Office Snacks Recipe : ऑफिसमधल्या छोट्या भुकेसाठी हेल्दी स्नॅक्स, आताच ट्राय करा 'हा' पदार्थ

घराच्या कोपऱ्यात लपलेला तब्बल १२ फूट अजगर; व्हिडिओ पाहून शहारे येतील

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT