Rakesh Pal Saam Digital
देश विदेश

Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं निधन; संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याची चर्चा करताना हार्ट अटॅक

Sandeep Gawade

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या चेन्नई दौऱ्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चेन्नईतील राजीव गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाल यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजनाथ सिंह यांनी रुग्णालयात पोहोचून श्रद्धांजली वाहिली.

राकेश पाल यांच्या निधनाबाबत राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. राकेश पाल एक सक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांचं भारताची सागरी सुरक्षा मजबूत करण्यात मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चेन्नई दौऱ्यावर आहेत. त्याच्या दौऱ्यासंदर्भात राकेश पाल आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आयएनएस अड्यार येथे काही अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. त्यामुळे त्यांना तातडीने चेन्नईतल्या राजीव गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

राकेश पाल १९८९ मध्ये भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले होते. ते मूळचे उत्तर प्रदेशचे असून ३५ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या होत्या. २०२३ मध्ये भारतीय तटरक्षक दलाचे २५ वे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते नवी दिल्ली येथे उपमहासंचालक (नीती आणि योजना), आणि अतिरिक्त महासंचालक कोस्ट गार्डचं काम पहात होते. त्यांना उल्लेखनीय कार्याबद्दल २०१३ मध्ये तत्ररक्षक पदक आणि २०१८ मध्ये राष्ट्रपती तंत्ररक्षक पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT