Indian Army Cheetah Helicopter Crash in mandala hills area representative image
देश विदेश

Cheetah Helicopter Crash : भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं, पायलटसह दोघे बेपत्ता

Indian Army Cheetah Helicopter Crash in Arunachal Pradesh : अरूणाचल प्रदेशात मोठी दुर्घटना घडली आहे. राज्यातील मंडला डोंगराळ भागात भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं.

Nandkumar Joshi

Indian Army Cheetah Helicopter Crash in Arunachal Pradesh : अरूणाचल प्रदेशात मोठी दुर्घटना घडली आहे. राज्यातील मंडला डोंगराळ भागात भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं. दुर्घटनेनंतर पायलटसह दोघे बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

अरुणाचल प्रदेशातील ही दुर्घटना घडली कशी याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पायलटसह दोघांचा शोध घेण्यात येत आहे. (Latest Marathi News)

अरुणाचल प्रदेशातील मंडलाच्या डोंगराळ भागात भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. याबाबत गुवाहाटीत संरक्षण विभागाचे पीआरओ कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील बोमडिलानजीक उड्डाण घेतलेल्या चीता हेलिकॉप्टरचा गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास संपर्क तुटल्याची माहिती मिळाली होती.

हेलिकॉप्टर बोमडिलाच्या पश्चिमेकडे मंडलाजवळ कोसळल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू झालं आहे, अशी माहितीही रावत यांनी दिली.

मागील वर्षीही चीता हेलिकॉप्टरला अपघात

मार्च २०२२ मध्येही जम्मू-काश्मीरमध्ये चीता हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या घटनेत दोन पायलटपैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर एकाला गंभीर दुखापत झाली होती. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे कारण समोर आले होते. हेलिकॉप्टर उतरवण्यात येत असतानाच खराब हवामानामुळे नियंत्रणाबाहेर गेल्याने ही दुर्घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "राजकारण करू नका..."; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचा फुल पाठिंबा, पाहा भाईजान नेमकं काय म्हणाला?

Maharashtra News Live Update: डेंगूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका महापालिकेचे खाजगी रुग्णालयांना पत्र

Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

8th Pay Commision : २.० फिटमेंट फॅक्टरमुळे तुमच्या पगारात होईल दुप्पट वाढ, कशी? जाणून घ्या सविस्तर

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT