india women and pakistan men love story anju verma Nasrullah love affair Saam TV
देश विदेश

Anju Verma: प्रेमासाठी पाकिस्तान गाठलं, लग्न करत धर्मही बदलला; आता म्हणतेय भारतात परत यायचंय

Anju Verma Love Stroy: काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील अंजू नामक तरुणी हे प्रेमासाठी भारत सोडून पाकिस्तानात गेली होती. तेथे जाऊन तिने पाकिस्तानी तरुणासोबत विवाह केला

Satish Daud

Anju Verma Love Stroy

प्रेम हे आंधळं असतं असं नेहमी म्हणतात. प्रेमात कोण काय करेल हे सांगता येत नाही. प्रेमात जात पात धर्म तसेच वयाचं बंधन नसतं. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील अंजू नामक तरुणी हे प्रेमासाठी भारत सोडून पाकिस्तानात गेली होती. तेथे जाऊन तिने आपला धर्म बदलला आणि इतकंच नाही, तर तिने पाकिस्तानी तरुणासोबत विवाह देखील केला. (Latest Marathi News)

लग्नानंतर तिने आपलं नाव फातिमा ठेवलं. पण आता याच फातिमाला पुन्हा भारतात यायचं आहे. फातिमाचा नवरा नसरुल्लाहने याबाबतची माहिती दिली आहे. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून तिला आपल्या मुलांची खूपच आठवण येत आहे. तिच्या आरोग्याचा विचार केला तर तिने परत भारतात जाणेच योग्य राहिलं, असं नसरुल्लाहने म्हटलं आहे.

विशेष बाब म्हणजे फातिमाला जरी भारतात यायचं असलं तरी, तिला पती आणि मुलं स्वीकारणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे. घर आणि लहान मुलांना सोडून गेल्यानंतर फातिमाच्या (अंजू) पतीने तिच्यासोबत सर्व संबंध तोडले असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे तिच्यासमोर मोठं कोडं निर्माण झालं आहे.

काय आहे प्रकरण?

20 जुलै रोजी राजस्थानमधील अंजू नामक विवाहित महिला जयपूरला जाते, असं सांगून घरातून निघून गेली होती. पण तिने जयपूरला न जाता थेट पाकिस्तानची वाट धरली होती. पाकिस्तानला गेल्यानंतरही ती आपल्या पतीसोबत व्हॉट्सअॅपवर बोलत राहिली आणि नंतर तिने खरं काय ते सांगून टाकलं.

अंजू पाकिस्तानात तिच्या प्रियकराला भेटायला गेली. दोघांचीही फेसबुकवरून ओळख झाली होती. पुन्हा भारतात परतणार असल्याचा दावा तिने केला होता. मात्र, त्यानंतर अंजूने प्रियकरासोबत लग्न करत आपला धर्म बदलला. तसेच फातिमा असं नाव देखील ठेवलं. नसरुल्लाहसोबत काही दिवसांचा सुखी संसार केल्यानंतर आता अंजूला भारतात परत यायचं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

SCROLL FOR NEXT