Cricket Toss Saam Tv News
देश विदेश

IND vs PAK Toss Record: पाकिस्तानविरोधात टॉस हरला, रोहितच्या नावावर नकोसा विक्रम

India vs Pakistan Champions Trophy 2025: पाकिस्तानविरोधात टॉस हरताच रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद. रोहित शर्मा म्हणाला ''काही फरक पडत नाही...

Bhagyashree Kamble

आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले आहेत. २३ फेब्रुवारी रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात स्पर्धेचा पाचवा सामना खेळवला जात आहे. हा सामना दुबई आंतराष्ट्रीय मैदानावर होत आहे.

सामनेचा निकाल कुणाच्या बाजूनं लागणार, त्याआधी टॉसकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. टॉसमध्ये पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान जिंकला आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर क्रिकेट इतिहासात नकोसा विक्रम नोंदवला गेलाय.

भारताच्या नावावर नकोसा विक्रम

रविवार २३ फेब्रुवारीला दुबई आंतराष्ट्रीय मैदानावर भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगत आहे. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही कर्णधारांमध्ये टॉस झाला. टॉस पाकिस्तान संघाच्या बाजूनं पडला.

पाकिस्तान कर्णधार रिझवाननं आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच टीम इंडियाला गोलंदाजीचे आव्हान दिले. पाकिस्तानविरूद्ध टॉस हारल्यावर भारत संघ आणि रोहित शर्मावर नकोशा विक्रमाची नोंद झालीय.

भारताने वनडे फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप २०२३ पासून ते आतापर्यंत १२ वेळा टॉस हरला आहे. त्यामुळे १२ वेळा वन फॉरमॅटमध्ये टॉस हरण्याचा विक्रम भारत संघ आणि कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेलाय. यापूर्वी हा रेकॉर्ड नेदरलँडच्या नावावर होता. सलग ११ वेळा वनडे टॉसमध्ये हरला होता. मात्र, हा रेकॉर्ड आता भारताने मोडलाय.

रोहित शर्माची प्रतिक्रिया

टॉस झाल्यावर कर्णधार रोहित शर्मा यानं प्रतिक्रिया दिलीय. 'पाकिस्ताननं टॉस जिंकल्यानं काही फरक पडत नाही. आम्ही प्रथम गोलंदाजी करू. फलंदाजीत आमच्याकडे अनुभवी युनिट आहेत. त्यामुळे खेळपट्ट्या कमी झाल्यास काय करावे आम्हाला ठाऊक आहे. संघाकडून आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT