सुप्रीम मस्कर, साम प्रतिनिधी
800 रुपये किलो चिकन आणि 340 रुपये किलो तांदुळ. महागाईचा हा उच्चांक लवकरच पाकिस्तानात पाहायला मिळणारेय.पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केलीय. आता महागाईच्या पायदळी तिथली जनता तुडवली जातेय. त्यामुळे पाकिस्तान भिकेला लागलाय. (India Terminates Trade Agreement With Pakistan)
भारतासोबत पाकिस्तानचा व्यापार थांबल्याने सुमारे 3800 कोटींचा द्विपक्षीय व्यापार ठप्प होणारेय. गेल्या वर्षी अटारी- वाघा सीमेवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये 3838. 53 कोटींचा द्विपक्षीय व्यापार झाला होता. मात्र व्यापार बंदीमुळे पाकिस्तानच्या निर्यात आणि आयात व्यापारावरही नकारात्मक परिणाम होणारेय.
व्यापार बंदीमुळे निर्यात आणि आयात ठप्प होणार
खत, बियाणं, औषधं यांची कमतरता भासणार
आयात थांबवल्याने स्थानिक बाजारात वस्तुंच्या किंमती वाढणार
कापड, औषधं, शेतमाल प्रक्रिया उद्योग अडचणीत येणार
देशाअतंर्गत असंतोष वाढणार
शांतता भंग केल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नकारात्मक परिणाम.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानची आर्थिक कोंडी करून त्यांना अद्दल घडवण्याचा प्रयत्न भारताने केलाय. पाकिस्तानने यातून धडा घ्यायला हवा, नाहीतर त्यांचा विनाश अटळ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.