Putin India Visit Saam Tv
देश विदेश

Putin India Visit: ४ वर्षांनंतर व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर, ३० तासांचा मेगाप्लान; १० लाख नोकऱ्या आणि अणुकराराची शक्यता

Vladimir Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा दोन्ही देशांसाठी खूपच महत्वाचा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान पीएम मोदींसाठी अनेक बैठका होतील यामध्ये महत्वाच्या करारावर चर्चा होईल.

Priya More

Summary -

  • व्लादिमीर पुतिन ४ वर्षांनंतर भारत दौऱ्यावर

  • रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा दोन दिवसांचा असेल

  • भारत-रशिया यांच्यात १० लाख नोकऱ्यांसाठी मोबिलिटी पॅक्ट होण्याची शक्यता

  • नागरिक अणुकरार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या करारावर चर्चा होण्याची शक्यता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा भारत दौरा २ दिवसांचा असणार आहे. ४ वर्षांनंतर ते भारतामध्ये येणार आहे. या दौऱ्यादरम्यान रशिया आणि भारत यांच्यामध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. हे करार दोन्ही देशांसाठी खूप मोठे यश मानले जात आहे. १० लाख भारतीयांना रशियात नोकऱ्या देण्याबाबत आणि अणुकरार होण्याची शक्यता आहे.

व्लादिमीर पुतिन आज संध्याकाळी ६ वाजता दिल्लीमध्ये पोहचतील. त्यांचा ३० तासांचा असून त्यासाठी मेगाप्लान करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी खास डिनरचे आयोजन केले आहे. त्यानंतर द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीचा विषय संरक्षण, ऊर्जा, अवकाश आणि व्यापार यावर केंद्रित असेल. पुतीन यांना राष्ट्रपती भवनामध्ये गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. शुक्रवारी म्हणजे ५ डिसेंबर रोजी पीएम मोदी आणि पुतीन हैदराबाद हाऊसमध्ये शिखर बैठक करतील. पुतीन यांच्या या दौऱ्याचा उद्देश भारत- रशिया धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करणे हा आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत-रशिया संरक्षण करारांव्यतिरिक्त भारतातून १० लाख कुशल कामगारांना रशियात रोजगार देण्यासाठी मोबिलिटी पॅक्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये नागरिक अणुकरार होऊ शकतो. या करारामुळे लहान अणु रिअॅक्टरच्या योजनेला बळ मिळून जाईल. रशिया S-400 क्षेपणास्त्र प्रणाली, Su-57 लढाऊ विमाने आणि वाढत्या तेल निर्यातीसाठी नवीन करारावर चर्चा करण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याने भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील मैत्री आणखी मजबूत होईल.

दरम्यान, व्लादिमीर पुतिन हे भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे दिल्लीत हाय अलर्ट आहे. त्यांचा दौरा दोन दिवसांचा असल्यामुळे दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जवळजवळ १३० सदस्यांच्या रशियन शिष्टमंडळासह पुतिन यांच्या आगमनासाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस, केंद्रीय सुरक्षा संस्था, निमलष्करी दल आणि रशियन विशेष दलांनी संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

SCROLL FOR NEXT