India Corona Update
India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घट, सक्रिय रुग्णही 10 लाखांखाली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारतात कोरोनाची गती आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. तब्बल महिनाभरानंतर सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे एक लाखांहून कमी नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 67,597 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 1188 बाधितांना आपला जीव गमावला आहे. तर याच्या एक दिवस आधी कोरोनाचे 83 हजार 876 नवे रुग्ण आले होते आणि 896 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता (India reports 67,597 new corona cases in last 24 hours).

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत एक लाख 80 हजार 456 जण कोरोनापासून बरे झाले आहेत (Recovery Rate) म्हणजेच 1 लाख 14 हजार सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत.

कोरोना (Corona Virus) महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 4 कोटी 23 लाख 39 हजार 611 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 4 हजार 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 8 लाख 40 हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे. एकूण 9 लाख 94 हजार 891 जणांवर उपचार सुरू आहेत.

देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाण 96.19 टक्के आहे. सक्रिय प्रकरणे 2.62 टक्के आहेत. कोरोना अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या (Corona Active Cases) बाबतीत भारत आता जगात 11व्या स्थानावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर भारतात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, काल भारतात कोरोना विषाणूसाठी 13,46,534 नमुने तपासण्यात आले, कालपर्यंत एकूण 74,29,08,121 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. गेले आहेत. गेल्या 24 तासांत 55 लाखांहून अधिक कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात 170 कोटींहून अधिक कोरोना लस देण्यात आल्या आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : संधी मिळेल त्यावेळी शिरुरला मंत्रिपदाची संधी देऊ; शरद पवारांचं आश्वासन

Ambulance Scam: राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा? कोर्टानं शिंदे सरकारकडे मागितला खुलासा; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

Chicken Shawarma : शोरमा खाल्ल्याने तरुणाचा गेला बळी, फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक? तज्ज्ञ म्हणाले...

Avneet Kaur : अवनीत कौरच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून नजरच हटणार नाही

SRH vs LSG,IPL 2024: हैदराबाद- लखनऊमध्ये काँटे की टक्कर! या सामन्यासाठी अशी असू शकते प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT