Satara, Covid 19 Saam Tv
देश विदेश

India Corona Update: कोरोना फोफावला! देशात 24 तासांत 4,435 रुग्णांची नोंद

देशात सध्या सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 23,091 झाली आहे.

Shivani Tichkule

Corona Cases In India : भारतात कोरोना प्रकरणांचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. जगभरात अद्यापही कोरोनाचा फैलाव सुरु आहे. भारतातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णसंख्येसोबतच आता दररोज मृत्यूचीही नोंद होत आहे. (Latest Marathi News)

गेल्या 24 तासात भारतात 4,435 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 15 जणांना आपला जीव गमवावा लागला. यापूर्वी मंगळवारी (4 एप्रिल) देशात 3,038 कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान दिवसागणिक हा नव्या रूग्णांचा वाढता आकडा पाहून देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट वर आली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 23,091 झाली आहे.

एकट्या दिल्ली (Delhi) बोलायचे झाले तर गेल्या 24 तासात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून महाराष्ट्रात 711 रुग्ण आढळले असून 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तराखंड या छोट्या राज्यातही अवघ्या 20 दिवसांत तीन मृत्यूची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात नव्या 711 कोरोनाबाधितांची नोंद

मंगळवारी, महाराष्ट्रात 711 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 218 रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना प्रादुर्भावामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,792 आहे. राज्यात गेल्या सात दिवसांत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT