ministry of external affairs ANI
देश विदेश

Countries on CAA News: 'चूक, खोटी माहिती, अवास्तव'; सीएएवर भाष्य केल्यानंतर भारताने केली अमेरिकेची कानपिळी

India Reacts On US Remark on CAA: कायदा लागू करणं ही "भारताची अंतर्गत बाब" असल्याचं उत्तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला दिले आहे. भारतात सीएए लागू केल्यानंतर अमेरिकेने त्यावर प्रतिक्रिया दिली होती.

Bharat Jadhav

India Reacts On US's CAA Remark :

भारतात सीएएचा कायदा लागू झाल्यानंतर त्यावर देशातून आणि परदेशातून समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकाची रणधुमाळी असलेल्या अमेरिकेनेही यावर प्रतिक्रिया दिलीय. या प्रतिक्रियेवरून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला खडसावलं.

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) च्या अंमलबजावणीवर अमेरिकेच्या टिप्पणीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अमेरिकेने सीएएवर केलेलं भाष्य म्हणजे 'चुकीचे, खोटी माहिती, अवास्तव असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. कायदा लागू करणं ही "भारताची अंतर्गत बाब" असेही म्हटले आहे.(Latest Marathi News)

सीएएच्या अंमलबजावणीबाबत यूएस स्टेट डिपार्टमेंटने केलेलं भाष्य आणि इतर अनेकांनी केलेल्या टिप्पण्या ह्या चुकीच्या, खोटी माहिती देणारे आणि अवास्तव असल्याचं भारतानं म्हटलंय. भारताची राज्यघटना आपल्या सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्याची हमी देते,”असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हा कायदा मानवी हक्कांसाठीच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धता दाखवणारा आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केलेल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील शोषित अल्पसंख्याकांना या कायद्यामुळे भारतात आश्रय मिळणार असल्याचंही जयस्वाल यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकता देणारा कायदा

'सीएए नागरिकत्व देणारा कायदा आहे, नागरिकत्व काढून घेणारा नाही. हे राज्यविहीनतेच्या समस्येचे निराकरण करतं, मानवी प्रतिष्ठा प्रदान करते आणि मानवी हक्कांचे समर्थन करतं. सीएएच्या अंमलबजावणीबाबत यूएस स्टेट डिपार्टमेंटनने केलेले विधान खोटं, चुकीची माहिती असलेला आणि अयोग्य आहे असे आम्हाला वाटते, रणधीर जयस्वाल म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT