India Pakistan Tensions सोशल मीडिया
देश विदेश

India Pakistan Tensions : तणाव वाढला! रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद एयरबेसवर भारताचा हल्ला, पाकिस्तानचा दावा

India Pakistan War News : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव आणखी वाढला आहे. भारताने रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद एयरबेसवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताकडून याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

Namdeo Kumbhar

रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद एयरबेसवर मध्यरात्री ड्रोनचा जोरदार हल्ला झाला. पाकिस्तानच्या अनेक शहरात ब्लॅकआऊट होते. अनेक शहरावर ड्रोन घिरट्या घेत होत्या. पाकिस्तानमधील तीन एअरबेसवर जोरदार ड्रोन हल्ला करण्यात आलााय. भारताने हा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानकडून मध्यरात्री पत्रकार परिषद घेत भारतावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही युद्धाची सुरूवात झाली आहे. भारताने पाकिस्तानसह अफगाणिस्तानवरही ड्रोनचा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, पाकिस्तानमधील स्थानिक मिडिया आणि सोशल मीडियातील पोस्टनुसार पाकिस्तानमधील अनेक शहरात मध्यरात्री ड्रोनने जोरदार हल्ला झाला आहे. लोक रस्त्यावर उरल्याचेही काही व्हिडिओतून दिसत होते.

पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस आणि त्याशिवाय लाहोर, इस्लामाबादमध्येही शुक्रवारी मध्यरात्री जोरदार स्फोट झाल्याची माहिती मिळाली. मध्यरात्री झालेल्या या स्फोटांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. भारताने नूर खान, मुरिद आणि रफीकी या तीन हवाई तळांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानकडून मध्यरात्री पत्रकार परिषद घेण्यात आली. लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, सर्व हवाई तळ आणि लष्करी मालमत्ता सुरक्षित असून कोणतेही नुकसान झालेले नाही.

पाकिस्तानी माध्यमांनुसार, रावलपिंडी आणि लाहोरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री अनेक ठिकाणी स्फोटांचा आवाज ऐकू आला. यातील एक स्फोट नूर खान एअरबेसजवळ झाला. या घटनेनंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे. लाहोर, इस्लामाबाद आणि पेशावर येथील विमानतळांवर विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

दुसरीकडे, भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचा आरोप केला आहे. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील जम्मू, उधमपूर आणि पंजाबमधील पठाणकोट येथील लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले. भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तरादाखल रावलपिंडीतील नूर खान एअरबेसवर अचूक हल्ला केल्याचा दावा काही भारतीय माध्यमांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव सुरू झाला. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. फ्रान्स आणि चीनसह अनेक देशांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि शांततापूर्ण चर्चेचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Phaltan Doctor death : फार्महाऊसवरून बनकरच्या मुसक्या आवळल्या, प्रमुख आरोपी PSI बदने फरारच

Nana Patole: कुणी कुणाला धमकावला तर घरात घुसून मारू, नाना पटोले यांचा रोख कुणाकडं?

Sachin Sanghvi : प्रसिद्ध गायक सचिन सांघवीविरुद्ध गुन्हा दाखल; अत्याचार अन् गर्भपाताचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Railway Recruitment: १२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT