MHA Asks States for mock drills @PIBHomeAffairs
देश विदेश

India - Pakistan Tension : भारत-पाक तणाव वाढला, गृहमंत्रालयाचं मोठं पाऊल; राज्यांना महत्वाचे आदेश

MHA Mock Drills : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं पाऊल उचललं आहे. बहुतांश राज्यांना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मॉकड्रील करण्याचे आदेश दिले आहेत.

Nandkumar Joshi

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव कमालीचा वाढला आहे. नवी दिल्लीत घडामोडींना वेग आलेला असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठ पाऊल उचललं आहे. बहुतांश राज्यांना मॉकड्रील करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

सूत्रांनुसार, नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांनी मॉकड्रीलचे आयोजन करावे, असे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला असून, युद्धाचे ढग गडद झालेले असतानाच गृहमंत्रालयाने राज्यांना अशा प्रकारचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्रालयाकडून राज्यांना दिलेल्या आदेशात काय?

हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन संचलित करणे

शत्रूकडून हल्ला झाला तर अशा परिस्थितीत स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे

हल्ला झालाच तर त्या परिस्थिती स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत नागरिकांना माहिती आणि प्रशिक्षण देणे

महत्वाचे प्रकल्प, संस्थांना युद्धाच्या काळात हल्ल्यापासून बचाव आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे

नवी दिल्लीत वेगवान घडामोडी

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत घडामोडी वेगाने घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल प्रमुख आणि नौदल प्रमुखांसोबत बैठक घेतल्यानंतर संरक्षण सचिवांसोबतही बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्चस्तरीय बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आदी उपस्थित होते. त्यामुळं भारत सरकार पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. यात २६ पर्यटकांना प्राण गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो या भीतीने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT