India-Pakistan Tension  Saam Tv News
देश विदेश

India Pakistan Tension : पाकिस्तान तोंडावर पडला, मदत मागायला गेला पण संयुक्त राष्ट्राने फटकारले

Pahalgam Attack News : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांची मदत मागितली, पण त्याला फटकार मिळाली. भारताच्या बाजूने बहुतेक देशांनी पाठिंबा दर्शवला आणि पाकिस्तानची नाचक्की झाली.

Namdeo Kumbhar

India Pakistan War News : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला थेट इशारा दिला. त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यातूनच पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्रांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची ही खेळी अयशस्वी ठरली. तिथे पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय. संयुक्त राष्ट्राकडून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. त्याशिवाय दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानलाही फटकारले आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला. दोन्ही देशांकडून युद्धाची तयारी सुरू करण्यात आली. त्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी बंद दाराआड चर्चा आयोजित केली. पाकिस्तानने या तणावावर तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती, तर भारताने सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. युएनमध्ये भारताला १५ पैकी १३ सदस्य देशाने पाठिंबा दिलाय.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि युद्ध टाळण्याचे आवाहन केलेय. गुटेरेस म्हणाले, युद्ध हे कोणत्याही गोष्टीवर समाधान आणि उपाय नाही. हल्ल्याच्या दोषींना कायदेशीर आणि विश्वासार्ह मार्गाने शिक्षा व्हावी. दरम्यान, गुटेरेस यांनी शांतता संवादासाठी आपले सहकार्य देण्याची तयारी दर्शवली.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपीय देशांना दहशतवादाविरोधात कठोर कारवाईची गरज असल्याचे सांगितले. पाकिस्तानने UNSC मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत शांततेची भाषा केली. पण भारताने याला दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पाकिस्तानला तोंडावर पाडले. युरोपीय युनियन आणि मलेशियासारख्या देशांनीही तणाव कमी करण्यासाठी शांतता आणि संवादाचे आवाहन केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT