India Pakistan war latest updates : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. हा वणवा अद्याप शांत झाला नाही, तोच आणखी एका युद्धाचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कोणत्याही क्षणी अणुयुद्धाचा (Nuclear War) भडका उडण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या (Intelligence Department) ताज्या अहवालात (Report) वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य युद्धासाठी (Potential War) पाकिस्तानकडून दहशतवादाला (Terrorism) दिलेले खतपाणी जबाबदार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख (Intelligence Chief) तुलसी गबार्ड यांनी अमेरिकन सिनेटमध्ये ३४ पानांचा अहवाल सादर केला. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा भडका उडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. इतकेच नाही, तर तुलसी यांनी पाकिस्तान अमेरिकेसाठी धोकादायक (Dangerous) असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांपासून (Nuclear Weapons) अमेरिकेला धोका असल्याचा इशारा (Warning) तुलसी गबार्ड यांनी दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमुळे अणुसंघर्षाचा (Nuclear Conflict) धोका निर्माण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश थेट हल्ला अथवा संघर्ष करण्याच्या तयारीत नाहीत, पण दहशतवाद्यांकडून तशी परिस्थिती तयार केली जाऊ शकते, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात अण्वस्त्रांची तैनाती वाढवली जात आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संघर्ष आता टोकाला जाऊन अण्वस्त्रांपर्यंत पोहोचू शकतो. पाकिस्तान सातत्याने भारताला चिथावणी देण्याचे काम करत आहे. भारताने सीमेपलीकडील दहशतवादाला उत्तर म्हणून मोठी लष्करी कारवाई केली, तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देऊन जगाला वेठीस धरू शकतो, असे या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानकडून लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (Ballistic Missiles) तयार करण्यात येत आहेत. या क्षेपणास्त्रांमध्ये अमेरिकेला लक्ष्य करण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्रांचा समावेश असू शकतो, असे तुलसी गबार्ड म्हणाल्या.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अणुबॉम्ब आहेत. मागील अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये टोकाचा संघर्ष सुरूच आहे. पण दहशतवादी हल्ल्यामुळे हा संघर्ष टोकाला जाऊ शकतो. पहलगाम हल्ल्याचे उदाहरण देत दोन देशांमधील संघर्षाचा कसा भडका उडू शकतो, याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ भारतीयांची धर्म विचारून हत्या केली होती. त्यानंतर भारताकडून 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.
पाकिस्तान अजूनही लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांना फूस लावत आहे. भारताच्या शांततेत व्यत्यय आणण्यासाठी सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असतानाही पाकिस्तान अण्वस्त्रांच्या साठ्यात गुप्तपणे वाढ करत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी पाकिस्तानकडून अमेरिकेला धोका असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.