पाकचे पंतप्रधान कॉपी बहाद्दर शाहबाज शरीफ....अगदी पावला-पावलावर ते भारताला आणि पंतप्रधान मोदींना कॉपी करत आहेत... शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअरबेसवर गेले....पाकचे पंतप्रधानही मोदींना कॉपी करत सियालकोट एअरबेसला भेट दिली....
आता हे पाकिस्तानचं कॉपी पेस्ट धोरण एवढ्यावरच थांबलं नाही तर भारतानं जागतिक स्तरावर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी 7 नेत्यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ पाठवण्याचं जाहीर केलं... आणि पाकनं लागोलाग ते कॉपी केलं आणि बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वात शांतीदूत पाठवण्याचं जाहीर केलं... मात्र पाकनं आतापर्यंत मोदींची स्टाईल कशी कॉपी केलीय? पाहूयात...
पाकचं कॉपी पेस्ट धोरण
- ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींची आदमपूर एअरबेसला भेट तर पाक पंतप्रधानांची सियालकोट सैन्यतळाला भेट
- ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची उच्चस्तरीय बैठक तर पाकनेही बोलावली उच्चस्तरीय बैठक
- पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू करार स्थगित, पाकनं शिमला करार रद्द केला
- भारताचा पाकवर ट्रेड स्ट्राईक, पाकनेही व्यापार बंदीचा निर्णय घेतला
- भारतानं पाक चॅनलवर बंदी घातली, पाककडून भारताच्या 16 चॅनलवर बंदी
- पंतप्रधान मोदींची मन की बात तर पाकनं आवाम की बात कार्यक्रम सुरु केला
एकीकडे भारतात सर्वपक्ष सरकार आणि सैन्यासोबत उभे आहेत... मात्र पाकस्तानमध्ये खासदार संरक्षण मंत्र्यांची खिल्ली उडवत आहेत...त्यामुळं एकतेची वज्रमूठ आवळलेल्या भारताची पाकिस्तानने कितीही कॉपी केली तरी शेवटी शेर तो आखिर शेर होता है....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.