Terror Plot Foiled Near India-Pakistan Border saam Tv
देश विदेश

India-Pakistan Border: BSFने उधळून लावला दहशतवादी कट; भारत-पाकिस्तान सीमेवरून हातबॉम्ब, काडतुसे, ३ पिस्तूल जप्त

Terror Plot Foiled Near India-Pakistan Border: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढलाय. याचदरम्यान बीएसएफने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावलाय.

Bharat Jadhav

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय. भारताच्या सर्व सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्याचदरमान सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफने दहशतवाद्यांचा कट उधळून लावलाय. बीएसफ आणि पंजाब पोलिसांच्या समन्वयाने अमृतसर जिल्ह्यातील भरोपाल गावाजवळ दहशतवादी कट उधळला. सीमा सुरक्षा दलानं मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा जप्त केलाय.

बीएसफच्या दलाला दहशतवादी करावाया संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून बुधवारी संध्याकाळी संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलाला दोन हातबॉम्ब, ३ पिस्तूल, ६ मॅगझिन आणि ५० जिवंत काडतुसे मिळून आली. जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि स्फोटकं पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत. बीएसएफ इंटेलिजेंस विंगने दहशतवादी हालचाली संदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने पंजाब पोलिसांसह कारवाई केली.

आंतरराष्ट्रीय सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. पहलगान हल्ल्यानंतर शस्त्रास्त्रांची तस्करी आणि भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यांविरोधात सैन्य सतर्क झाले आहे. काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली होती. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केलीय.

दरम्यान मंगळवारी अमृतसरच्या काठियानवाला बाजारात गोळीबारीची घटना घडली होती. दोन अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी गँगस्टर रवनीत सिंग उर्फ सोने मोटे याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी अमतसरचे एडीसीपी विशालजीत सिंग यांनी माहिती दिलीय. गोळीबाराच्या घटनेनंतर आम्ही घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आहे आणि गुन्हेगारांना लवकरच पकडण्यात येईल.गँगस्टर रवनीत सिंग उर्फ ​​सोने मोटेला रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती एडीसीपी विशालजीत सिंग यांनी दिली.

आणखी ४ ठिकाणं टार्गेटवर, खतरनाक प्लॅन उघड

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली जात आहे. दरम्यान दहशतवाद्यांनी एकाच वेळ ४ ठिकाणी हल्ला करण्याचा प्लॅन आखला होता. दहशतवादी बैसरन व्हॅली, आरू घाटी, अमिझमेंट पार्क आणि बेताब घाटीमध्ये हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन होता. या चारही पर्यटनस्थळाची दहशतवाद्यांनी रेकी केली होती. पण सुरक्षाव्यवस्था अधिक असल्यामुळे इतर ३ ठिकाणी हल्ला केला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT