INDIA OFFICIALLY MAPS 28 PLACES IN LADAKH WITH STANDARD NAMES saam tv
देश विदेश

भारताने 28 ठिकाणांची नावं बदलली; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

28 Places in Ladakh Officially Recognised: भारत सरकारने लडाखमधील 28 ठिकाणे आणि भौगोलिक संरचनांची सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशावर प्रमाणित नावांसह नोंद केली आहे. जाणून घ्या या निर्णयामागचा नेमका उद्देश.

Omkar Sonawane

भारत सरकारने केंद्रशासित प्रदेश लडाखमधील 28 ठिकाणे आणि भौगोलिक संरचनाची अधिकृत सर्व्हे ऑफ इंडियाच्या नकाशावर नोंदवली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2 ऑक्टोबर रोजी याबाबत माहिती दिली. लडाख प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या 28 ठिकाणांमध्ये पर्वतशिखरे, जमिनीचे भाग, खिंडी, हिमनद्या, दऱ्या आणि इतर भौगोलिक ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांची योग्य ओळख सुनिश्चित करणे आणि त्यांच्या नावाबाबत तसेच भौगोलिक महत्वाबाबत जनजागृती करणे हा या प्रक्रियेचा उद्देश असल्याचे सरकारने सांगितले आहे.

लडाखमधील 28 ठिकाणांची नोंद

सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशावर नोंद झालेल्या ठिकाणांमध्ये ‘अतिशा गिरी’ हे पर्वतशिखर, ‘ब्रांग्सा’ हा जमिनीचा भाग आणि ‘चपचिंगल पास’ यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणांना लडाखच्या अधिकृत नकाशावर प्रमाणित नाव आणि भौगोलिक प्रकारासह स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, केंद्र सरकार आणि लडाख प्रशासन यांच्यातील चर्चेनंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विविध ठिकाणांची नावे अधिकृत कागदपत्रे आणि नकाशांमध्ये एकसमान पद्धतीने नोंदवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

लडाखचा उत्तर आणि पूर्व भागावरून भारत आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे एखाद्या भागाची भौगोलिक ओळख आणि त्याची अधिकृत नकाशांमध्ये नोंद होणे हे प्रशासकीय आणि धोरणात्मक महत्वाचे मानले जाते.

मात्र, गृह मंत्रालयाच्या अधिकृत घोषणेत या 28 ठिकाणांची नोंद करण्यामागे चीनसोबतच्या सीमा वादात भारताचा दावा मजबूत करणे हा उद्देश असल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. या ठिकाणांची योग्य ओळख आणि नागरिकांमध्ये त्याबाबत जनजागृती करणे हा यामागचा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल! टेस्ट पास करण्यासाठी सरकारचा नवा नियम आला समोर, वाचा सविस्तर

भर समुद्रात मासळीची लूट, ट्रॉलरला घेराव घालून मासळीवर दरोडा

Business Ideas For Women: 12 वी पास महिलांसाठी कामाची संधी, हे 5 बिझनेस लवकरात लवकर सुरू करा

ऑडिओ क्लिपवरून भाजप-शिंदेसेनेत तणाव? भाजपचा जरांगेंआडून शिंदेंना संपवण्याचं कट? फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कुणाची ताकद?

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पैशांचा सुळसुळाट, मतदारांना 10 हजार वाटल्याचा विरोधकांचा आरोप

SCROLL FOR NEXT