India faces a growing nutrition crisis as millions struggle to afford balanced and protein-rich food amid rising inflation. saam tv
देश विदेश

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

India Nutrition Crisis Un-Report-2026: पोषण म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे, तर शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषकतत्वं आणि प्रथिने योग्य प्रमाणात मिळणे होय. मात्र, भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या रोजच्या जेवणात पोषकतत्वांचा समावेश असतो का?.. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांचा अहवाल नेमकं काय सांगतो? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

देशात आत्मनिर्भरतेचे वारे वाहत असताना कोट्यवधी भारतीयांना मात्र पौष्टिक आहारापासून वंचित राहावं लागतंय. हो तुम्ही बरोबर ऐकलंत... संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालातून देशातील भयाण वास्तव समोर आलंय. देशातील 52 कोटी नागरिकांच्या ताटातून संतुलित आणि पौष्टिक आहार गायब झाल्याची गंभीर बाब संयुक्त राष्ट्राच्या 'स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2026'च्या अहवालातून समोर आलीये. म्हणजेच, फळे, भाज्या, डाळी आणि प्रथिनंयुक्त आहार करणं कोट्यवधी नागरिकांना परवडत नाहीये. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात देशनिहाय दैनंदिन आहारावरील खर्चही नमूद करण्यात आलाय, तोही पाहा...

आहारावरील दैनंदिन खर्च

भारत 343 रू

पाकिस्तान 343 रू

बांगलादेश 399 रू

चीन 317 रू

अमेरिका 249 रू

महत्त्वाचं म्हणजे, गेल्या 2 दशकांत भारताने कुपोषण कमी करण्यात प्रगती केली असली, तरी आता मुलांमधील ठेंगणेपणा आणि वयोवृद्धांमधील लठ्ठपणा ही नवी आव्हाने समोर आलीये. सध्याच्या गतीनं जगाला 2030 पर्यंत कुपोषणमुक्त उद्दिष्ट गाठणं कठीण असल्याचंही संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय. इतकंच नव्हे तर जगभरातील तब्बल 269 कोटी नागरिकांना पौष्टिक आहार खाणं आवाक्याबाहरेचं झालंय. यात भारताचाही एक तृतियांश लोकसंख्येचा समावेश आहे. सरकारनं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत स्वस्त धान्याचा कायदेशीर हक्क दिला असला तरी पौष्टिक आहाराकडे आता लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAची थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर धडक कारवाई; एक्सपायर अन्नपदार्थ आढळल्यानं परवाना रद्द

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? मोदींच्या मनात फडणवीसच शिक्षणमंत्री

पेपरफुटीनंतर GenZच्या निशाण्यावर इथेनॉल, CJPच्या धर्तीवर E-20 जनता पार्टी

Maharashtra News Live Update:

मुलींना नको शेतकरी नवरा, ग्रामीण महाराष्ट्रातलं भयाण वास्तव

SCROLL FOR NEXT