नवी दिल्ली: भारत (India) २०२९ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची तयारी करत आहे. भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून डिसेंबर २०२१ मध्येच पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. आता २०२९ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, असा दावा एसबीआयने आपल्या अहवालात केला आहे.
भारत (India) २०२७ मध्ये जर्मनीला आणि २०२९ पर्यंत जपानला मागे टाकू शकतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गट मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्या कांती घोष यांच्या अहवालातस त्यांनी हा दावा केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत उत्पादन १३.५ टक्क्यांनी वाढले आहे. या दराने, भारत चालू आर्थिक वर्षात सर्वात वेगाने विस्तारणारी मोठी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, २०१४ पासून भारत मोठ्या संरचनात्मक बदलातून गेला आहे आणि आता पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२१ पर्यंत भारताने यूकेला मागे टाकून ५वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली होती.
भारताच्या(India) GDP चा वाटा आता जागतिक GDP च्या ३.५ टक्के आहे, जो २०१४ मध्ये २.६ टक्क्यांवरून वाढला आहे आणि २०२७ मध्ये तो चार टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्या जागतिक जीडीपीमध्ये जर्मनीचा वाटा चार टक्के आहे.
२०२२-२३ या वर्षासाठी भारताचा जीडीपी विकास दर ६.७ टक्के ते ७.७ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे म्हटले आहे. "जगातील अनिश्चिततेमुळे या काळात भारतासाठी ६ टक्के ते ६.५ टक्के वाढ ही नवीन सामान्य बाब बनली आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे", असं या अहवालात म्हटले आहे.
आगामी काळात चीनमधील (China) गुंतवणूक कमी होण्याची शक्यता असल्याचे या अहवालात म्हटले आहे. याचा फायदा भारताला होईल. जागतिक टेक कंपनी ऍपलचा आयफोन 14 मॉडेलचा काही भाग जागतिक विक्रीसाठी भारतात हलवण्याचा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी गोष्ट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.