संतापजनक: दलितांना हातपंपावर पाणी भरण्यास मज्जाव करत शिवीगाळ; 'तुमच्यामुळे आमचं पाणी बाटतं...,'

आमच्या इथे पाणी भरायला यायच नाही, अन्यथा महागात पडेल...
Yavatmal Crime News
Yavatmal Crime Newsसंजय राठोड

संजय राठोड -

यवतमाळ: महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याचं आपण नेहमी म्हणतो. मात्र, याच पुरागामी महाराष्ट्रात आजही विशिष्ट जातीमधील नागरिकांना त्यांच्या जातीवरुन शिवीगाळ केल्याच्या घटना राजरोसपणे घडत आहेत.

अनेक महापुरुषांनी जातीभेद करु नका याची शिकवण दिली असली तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे जाती-पातीचं विष किती प्रमाणात पसरलं आहे याचा प्रत्येय यवतमाळमध्ये (Yavatmal) नव्याने आला आहे.

एका हातपंपावर पाणी भरण्यास आलेल्या मातंग समाजातील काही महिलांना राखल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या महागांव तालुक्यातील पोखरी येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे.

पाहा व्हिडीओ -

'तुम्ही मातंग समाजाचे लोक, तुमच्यामुळे आमचं पाणी बाटते असे म्हणत चौघांनी महिलांना हातपंपावरती पाणी भरण्यास मज्जाव केला. धक्कादायक म्हणजे ज्यांनी ही जातीवाचक शिवीगाळ केली त्यांच्याविरोधात पोलिसांनी (Police) कसलीही कारवाई केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पोखरी येथील एका हातपंपावर दलित समाजातील महिला पाणी भरायला गेल्या असता गावातील काही टग्यांनी त्यांचा हंडा फेकून देत, 'तुम्ही मातंग आहात, आमच्या इथे पाणी भरायला यायच नाही, अन्यथा महागात पडेल' असं म्हणत पाणी भरायला मज्जाव केला.

Yavatmal Crime News
चीन आणि तैवानमध्ये पुन्हा वाढला तणाव, लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैवानच्या सागरी हद्दीत

शिवाय या घटनेबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करुन देखील ते काही नोंद घेत नसल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. या महिन्यातील ही पाचवी घटना असल्याचंही पीडितांनी सांगितलं.

दरम्यान, या चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्यांना अद्यापही अटक झाली नाही. महत्वाचं म्हणजे अनुसूचित जातीचेच आमदार महागांव- उमरखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. एकविसाव्या शतकात देखील जाती-पातींमधील भेद पुर्णपणे संपले नसल्याचं या घटनेतून उघड झालं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com