India Lok Sabha Election 2024 Results Live Saam TV
देश विदेश

Lok Sabha Election 2024 Results Live: एनडीएला तिसऱ्यांदा बहुमत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार

Lok Sabha Election Results Live Updates 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. एकूण ५४३ जागांसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल.

Satish Daud

Lok Sabha Election Results : एनडीएला तिसऱ्यांदा बहुमत,  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार

भाजपने दिलेला ४०० पारचा नारा हुकला असला तरी एनडीएला तिसऱ्यांदा बहुमत मिळत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तिसऱ्यांदा एनडीएला बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत.

आम्ही अमेठीच्या लोकांची सेवा करु; पराभवानंतर स्मृती इराणी यांची पहिली प्रतिक्रिया

अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा हे विजयी झाले आहेत. पराभवानंतर स्मृती इराणी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कायम अमेठीच्या लोकांची सेवा करु, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

कांग्रा मतदारसंघात भाजपचा विजय; राजीव भारद्वाज विजयी

भाजपचे उमेदवार राजीव भारद्वाज यांचा विजय झाला आहे. त्यांचा जवळपास २,५१,८९५ मतांनी विजय झाला आहे.

गुजरातच्या राजकोटमध्ये भाजपच्या परशोत्तम खोडाभाई रुपाला यांचा विजय

गुजरातमध्ये राजकोट मतदारसंघातून परशोत्तम खोडाभाई रुपाला यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या परेश धनानी यांचा पराभव केला आहे.

समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव मैनपुरी मतदारसंघातून विजयी

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव या मैनिपुरी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी २२१६३९ मतांनी विजय मिळवला आहे.

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचा विजय

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार बिप्लब यांचा पश्चिम त्रिपुरा येथून विजयी झाले आहेत. त्यांनी ६११५७८ मतांनी विजय मिळवला आहे.

Rahul Gandhi Win From Waynad: वायनाडमधून राहुल गांधीचा ३ लाखांहून अधिक मतांनी विजय

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केरळमधील वायनाडमधून विजय झाला आहे. त्यांनी ३६४४२२ मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे.

 Madhya Pradesh Election: मध्यप्रदेशमधील गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिंधिया यांचा विजय

गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिधिंया यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचा पराभव केला आहे. ५४०९२९ मतांनी ते विजयी झाले आहेत.

पटियाला मतदारसंघात काँग्रेसचा विजय; धर्मवीर गांधीना मिळाले यश

पटियाला मतदारसंघात आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहेत. पटियालातून धर्मवीर गांधी यांचा विजय झाला असून त्यांनी बलबीर सिंग यांचा पराभव केला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय; हमिरपूर मतदारसंघातून अनुराग ठाकूर जिंकले

केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर यांचा हिमाचल प्रदेशमधील हमिरपूर मतदारसंघातून विजय झाला आहे. त्यांनी १८२३५७ मतांनी विजय मिळवला आहे.

राजस्थानच्या बिकानेर मतदारसंघात भाजपच्या अर्जुन राम मेघवाल यांचा विजय

राजस्थानच्या बिकानेर मतदारसंघातून अर्जुन राम मेघवाल यांचा विजय झाला आहे. त्यांनी ५५७११ मतांनी विजय मिळवला आहे.

पंजाबमधील जालंधरमधून चरणजीत सिंह यांचा विजय

पंजाबमधील जालंधरमधून काँग्रेसचे चरणजीत सिंह यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी १७५९९३ मतांनी विजय मिळवला आहे.

धारवाड मतदारसंघातून मंत्री प्रल्हाद जोशी यांचा विजय

कर्नाटकमधील धारवाड मतदारसंघातून केंद्रिय मंत्री आणि भाजपचे उमेदवार प्रल्हाद जोशी यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस नेते विनोद असोती यांचा ९७ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.

पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघातून माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणचा विजय

पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघातून काँग्रेस नेते रंजन चौधरी यांचा पराभव झाला असून टीएमसीचे उमेदवार युसूफ पठाण यांचा विजय झाली आहे.

अयोध्येत भाजपचा पराभव; लल्लू सिंग पडले

अयोध्येत भाजपचा पराभव झाला आहे. लल्लू सिंग यांचा पराभव झाला आहे. अयोध्येत समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांचा विजय जाला आहे.

भाजपचे शंकर लालवानी यांचा इंदोरमधून विजय

भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांचा इंदौरमधून विजय झाला आहे. ११.७५ मतांनी त्यांचा विजय झाला आहे.

भाजपच्या दोन बड्या नेत्यांचा पराभव

महाआघाडीचे उमेदवार सुदामा प्रसाद यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांनी केंद्रिय मंत्री आर के सिंह यांचा पराभव केला आहे. त्याचसोबत तिरुवनंतपुरमधून शशी थरुर विजयी झाले आहेत. केंद्रिय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा विजय झाला आहे.

दिल्लीत प्रियांका गांधीच्या घराबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

लोकसभा निवडणुकीच काँग्रेस चांगला विजय मिळवणार असल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांच्या दिल्लीतील घराबाहेर जल्लोष केला आहे.

Narendra Modi Win In Varanasi: वाराणसीतून १ लाख ५३ हजार मतांनी पंतप्रधान मोदींचा विजय

वारणसीतून भाजपचे उमेदवार पंतप्रधान मोदी यांचा विजय झाला आहे. १ लाख ५३ हजार मतांनी नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत.

जे पी नड्डांच्या घरी भाजपची महत्त्वाची बैठक सुरु

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. त्यात भाजपला इंडिया आघाडीने चांगली टक्कर दिली आहे. त्यानंतर आता भाजपचे जे पी नड्डा यांच्या घरी बैठक बोलावली आहे. भाजपचे प्रमुख नेते बैठकील उपस्थित आहेत.

विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान यांचा विजय

विदिशामध्ये भाजपचे उमेदवार शिवराज सिंह चौहान ८,२०,८६८ मतांनी विजयी झाले आहे.

लडाखमध्ये मोहम्मद हनीफा यांचा विजय

लडाखमध्ये मोहम्मद हनीफा यांचा २८६७३ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडीत चुरशीची लढत

लोकसभा निवडणूकीचे निकाल आता स्पष्ट व्हायला लागले आहेत. लोकसभा निवडणूकीत एनडीए २९५ जागांवर आघाडीवर आहे तर इंडिया आघाडी २६१ जागांवर पुढे आहे.

Smruti Irani: अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव

अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणींचा पराभव झाला आहे. अमेठीत काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा विजयी झाले आहे.

पंजाबमधील फतेहगढ़ साहिब मतदारसंघात अमर सिंह यांचा विजय

पंजाबमधील फतेहगढ साहिबमधून राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार अमर सिंह यांचा विजय झाला आहे. ३४२०२ मतांनी त्यांचा विजय झाला आहे.

कर्नाटकमधील मांड्या मतदारसंघातून एच डी कुमारस्वामी विजयी

कर्नाटकमध्ये जनता दलच्या एच डी कुमारस्वामी यांचा विजय झाला आहे. मांड्या मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत.

कनौजमध्ये समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आघाडीवर

कनौजमध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आघाडीवर आहे. अखिलेश यादव १,११,७४३ मतांनी आघाडीवर आहे.

सुल्तानपूरमध्ये मेनका गांधी २० हजार मतांनी पिछाडीवर

सुल्तानपूरमध्ये भाजपच्या मेनका गांधी २० हजार मतांनी पिछाडीवर आहे. समाजवादी पार्टीचे उमेदवार राम भुआल निषाद हे पुढे आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे. काँग्रेस या निवडणुकीत चांगला विजय मिळवेल, असं चित्र सध्या दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद संध्याकाळी ५.३० वाजता होत आहे.

राजस्थानमधील जयपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मंजू शर्मा यांचा विजय

जयपूर मतदारसंघातून मंजू शर्मा या विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

कर्नाटकमधील चित्रदुर्ग मतदारसंघातून गोविंद कर्जोळ विजयी

कर्नाटकमधून भाजपचे गोविंद मुक्तप्पा करजोळ यांचा विजय झालेला आहे. जवळपास ४८१२१ मतांनी ते विजयी झाले आहेत.

केरळमध्ये त्रिशूर मतदारसंघातून भाजपचे सुरेश गोपी विजयी

केरळमध्ये त्रिशूम मतदारसंघातून सुरेश गोपी विजयी झाले आहेत. भाजपचे सुरेशी गोपी यांनी पहिल्यांदा आघाडी घेत विजय मिळवला आहे.

तिरुवनंतपुरम मतदारसंघातून शशी थरुर १४९२६ मतांनी आघाडीवर

तिरुवनंतपुरुम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शशी थरुर १४९२६ मतांनी आघाडीवर आहे. तर राजीव चंद्रशेखर पिछाडीवर आहेत.

रायबरेलीमधून काँग्रेस विजयाच्या मार्गावर; राहुल गांधीची २ लाख मतांनी आघाडी

रायबरेली मतदारसंघात राहुल गांधी हे २ लाख मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीच्या कलांमध्ये एनडीने ३०० चा आकडा पार केला आहे. परंतु विरोधी पक्षांनीदेखील अनेक ठिकाणी बहुमत मिळवले आहे. महाराष्ट्रात एनडीए आणि इंडिया आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी एक हाती विजय मिळवणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. याचसोबत उत्तर प्रदेशमध्येदेखील भाजपला धक्का बसला आहे.

पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का! माजी मूख्यमंत्री चरणजीत सिंह जालंधर मतदारसंघातून विजयी

पंजाबचे माजी मुख्यंमत्री आणि काँग्रेस उमेदवार चरणजीत सिंह यांचा जालंधर मतदारसंघातून विजय झाला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार सुशील कुमार रिंकू यांना १,७५,९९३ मतांनी हरवले आहे.

Hyderabad Election Results 2024 LIVE:हैदराबादमध्ये भाजप अपयशी

तेलंगणातील हैदराबाद मतदारसंघावर एआयएमआयएमचे वर्चस्व कायम आहे. पक्षप्रमुख आणि विद्यमान खासदार असदुद्दीन ओवेसी हे भाजप उमेदवार माधवी लता यांच्यापेक्षा 2.33 लाख मतांनी आघाडीवर आहेत.

रविशंकर प्रसाद 77851 मतांनी आघाडीवर

रविशंकर प्रसाद पटना साहिबमधून 77851 मतांनी आघाडीवर आहेत.

केरळमध्ये भाजपला मिळणार पहिला खासदार? सुरेश गोपी 70000 मतांनी पुढे

भाजप केरळमध्ये खातं घडणार असल्याचा अंदाज आहे. सुरेश गोपी हे 70000  मतांनी आघडीवर आहेत.

दिल्लीत एनडीएची विजयाच्या दिशेने वाटचाल; सातही जागांवर आघाडी

दिल्लीत भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. ७ पैकी ७ जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे.

राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या विजयाचा विक्रम मोडला

राहुल गांधी हे रायबरेली आणि वायनाड दोन्ही मतदारसंघातून आघाडीवर आहेत. राहुल गांधी यांनी सोनिया गांधीच्या विजयाचा विक्रम मोडला आहे. राहुल गांधीनी २,२२,२१९ पेक्षा अधिक मतांनी आघाडी मिळवत सोनिया गांधीचा विक्रम मोडला आहे.

गांधी नगरमधून अमित शाह ६ लाख मतांनी आघाडीवर

गांधी नगरमधून अमित शाह हे विजयाच्या मार्गावर वाटचाल करताना दिसत आहे. अमित शाह ६ लाख मतांनी आघाडीवर आहेत.

Raibareli Election Result: लोकसभा निवडणूकीच्या निकालापूर्वीच भाजप उमेदवाराने स्विकारली हार

रायबरेली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी आपली हार मान्य केली आहे. दिनेश प्रताप सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

भाजपने गाठला ३०० चा आकडा; तर इंडिया आघाडीची २२५ जागांवर आघाडी

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार एनडीए ३०० जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी २२५ जागांवर पुढे आहे.

अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी ६२ हजार मतांनी पिछाडीवर

अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी ६२ हजार मतांनी पिछाडीवर आहे. तर काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे आघाडीवर आहेत.

उत्तराखंडमध्ये भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल; पाचही जागांवर आघाडी

उत्तराखंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. पाच पैकी पाचही जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये अजय भट्ट २,५०,०० मतांनी आघाडीवर आहे. तर माला राज्यलक्ष्मी १,१५,०० मतांनी आघाडीवर आहे.

मथुरा मतदारसंघात हेमा मालिनी यांची आघाडी

मथुरा मतदारसंघातून हेमा मालिनी आघाडीवर आहेत. हेमा मालिनी जवळपास १,८९,५३५ मतांनी पुढे आहे.

उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीची ४३ जागांवर आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीची ४३ जागेवर आघाडी आहे. त्यापैकी ३६ जागांवर समाजवादी पार्टीने आघाडी मिळवली आहे. तर भारतीय जनता पार्टी ३३ जागांवर आघाडीवर आहे.

उत्तर प्रदेशमधील पीलीभीत मतदारसंघातून जितिन प्रसाद यांची आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये पीलीभीत मतदारसंघात जितिन प्रसाद आघाडीवर आहेत. ते जवळपास १,०४,९१२ मतांनी आघाडीवर आहेत.

 कर्नाटकात प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव

कर्नाटकमधून प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे. रेवण्णा हे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू आहेत. अलिकडच्या काळात त्यांच्यावर एसआयटी स्थापन झाली होती. अशात कर्नाटकमधून त्यांचा पराभव झालाय.

पश्चिम बंगालमधून टीएमसीचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी आघाडीवर

पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर मतदारसंघातील टीएमसीचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी आघाडीवर आहेत. जवळपास २,४२,०६४ मतांनी अभिषेक बॅनर्जी आघाडीवर आहे.

Ayodhya Faziabad Result: अयोध्या मतदारसंघातून लल्लू सिंह पिछाडीवर

अयोध्येत फैजाबाद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लल्लू सिंह पिछाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद ४,६९० मतांनी आघाडीवर आहे.

Asansol Election Result: आसनसोल मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आघाडीवर आहे. आसानसोल मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर आहे. जवळपास २६,१९७ मतांनी पुढे आहे.

रवीशंकर प्रसाद २० हजार मतांनी आघाडीवर

बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघातून रवीशंकर प्रसाद २० हजार मतांनी आघाडीवर आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एका तृणमूल काँग्रेसचे सरकार येईल अशी आशा कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे. कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच जल्लोष केला आहे.

Telangana Election Result: तेलंगणात भाजपची आठ जागांवर आघाडी; BRS ला मोठा धक्का

तेलंगणात भाजपने मोठी आघाडी मिळवली आहे. लोकसभेच्या आठ जागांवर भाजप पुढे आहे. तर काँग्रेस आठ जागांवर आघाडीवर आहे.

गांधीनगर मतदारसंघातून अमित शाह ५ लाख मतांनी आघाडीवर

गुजरातमधील गांधी मतदारसंघातून अमित शाह ५ लाख मतांनी आघाडीवर आहे. अमित शाह हे गांधीनगर मतदारसंघातून विजयी होतील, असा विश्वास वर्तवला जात आहे.

मंडी मतदारसंघातून कंगना रणौत जवळपास ३० हजार मतांनी आघाडीवर

मंडी लोकसभा मतदारसंघातून आलेल्या कलानुसार कंगना रणौत आघाडीवर आहे. कंगना रणौत ३० हजार मतांनी पुढे आहे. विक्रमादित्य सिंह हे पिछाडीवर आहे.

दिल्लीत सर्व जागांवर भाजप आघाडीवर

दिल्लीत सर्व जागांवर भाजप आघाडीवर आहे. ७ पैकी ७ जागांवर भाजप पुढे आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची आघाडी; २८ जागांवर आघाडी

पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये टीएमसी आघाडीवर आहे. ४१ पैकी २८ जागांवर टीएमसी आघाडीवर आहे. तर भाजप १० जागा आणि काँगेस एका जागेवर पुढे आहे.

लखनऊमध्ये राजनाथ सिंह आघाडीवर

लखनऊमध्ये राजनाथ सिंह जवळपास १९ हजार मतांनी आघाडीवर आहे.

Ayodhya loksabha Election Result: अयोध्येत भाजपचे लल्लू सिंग पिछाडीवर

अयोध्या मतदारसंघात भाजप पिछाडीवर आहे. लल्लू सिंग हे पिछाडीवर आहे.

गुजरातमध्ये २६ पैकी २४ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. एकूण २६ जागांपैकी २४ जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यातील एक जागा भाजप जिंकला आहे.

Delhi Election Result: दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का! भाजपची ६ जागांवर आघाडी

दिल्लीतील सात मतदारसंघातील कल समोर आले आहेत. त्यानुसेार भाजपने ६ जागांवर आघाडी मिळवली आहेत. तर चांदनी चौक या एकाच जागेवर जेपी अग्रवाल आघाडीवर आहेत.

अमेठीमध्ये स्मृती इराणी २४ हजार मतांनी पिछाडीवर तर वायनाडमधून राहुल गांधी १ लाख मतांनी आघाडीवर

अमेठीमध्ये स्मृती इराणी या २४ हजार मतांनी पिछाडीवर आहे. अमेठीतून केएल शर्मा यांनी आघाडी घेतली आहे. तर वायनाडमधून राहुल गांधी १ लाख मतांनी आघाडीवर आहे.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची २८ हजार मतांनी आघाडी

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे करनाल लोकसभा मतदारसंघातून २८ हजार मतांनी लीड मिळवली आहे.

Madhya Pradesh Election Result: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची विदिशा मतदारसंघातून आघाडी

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आघाडी घेतली आहे. शिवराज सिंग हे १,८८,३५० मतांनी आघाडीवर आहेत.

कन्नौजमधून अखिलेश यादव ३५ हजार मतांनी आघाडीवर

कन्नौज मतदारसंघातून अखिलेश यादव ३५ हजार मतांनी आघाडीवर आहे. पंतप्रधान मोदी वाराणसीतून ३१ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे.

बिहारमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का! फक्त ४ जागांवर आघाडी

बिहारमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का मिळू शकतो. बिहारमध्ये भाजप ३६ जागांवर पुढे आहे. तर इंडिया आघाडी फक्त ४ जागांवर पुढे आहे.

Hyderabad Voting Result: हैदराबादमध्ये एमआयएमचे असुद्दीन औवेसी आघाडीवर

हैदराबाद मतदारसंघातून एमआयएमचे असुद्दीन औवेसी आघाडीवर आहेत.ते जवळपास १५४६१ मतांनी पुढे आहेत.

Congress leading On 100 Seat: काँग्रेसने केला १०० चा आकडा पार

निवडणुक आयोगानुसार काँग्रेसने १०० जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भारतीय जनता पार्टी २३१ जागांवर पुढे आहे.

गांधी नगरमध्ये दीड लाख मतांनी अमित शाह आघाडीवर

गांधी नगरमध्ये भाजपचे उमेदवार अमित शाह आघाडीवर आहे. १ लाख ५५ हजार मतांनी अमित शाह आघाडीवर आहे.

अमेठीमधून स्मृती इराणी जवळपास १५ हजार मतांनी पिछाडीवर

अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी १५०६० मतांनी पिछाडीवर आहे. अमेठीत काँग्रेसचे केएल शर्मा यांनी आघाडी घेतली आहे.

देशाभरात कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर? पाहा एका क्लिकवर

निवडणुक आयोगानुसार ४७५ जागांपैकी २१७ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस ८१ जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पार्टी २८ जागांवर पुढे आहे.

मथुरा मतदारसंघातून कंगना रणौत आघाडीवर

लोकसभा निवडणुकांच्या कलानुसार, कंगना रणौत १४,७३४ मतांनी पुढे आहे. तर हेमा मालिनी मथुरेतून आघाडीवर आहेत. मनोजी तिवारी जवळपास १५३४७ मतांनी पुढे आहे.

Narendra Modi ahead from Varanasi :  वाराणसीतून नरेंद्र मोदी आघाडीवर

वारणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. काही वेळापूर्वी नरेंद्र मोदी ५ हजार मतांनी पिछाडीवर होते. मात्र, आता ते पुन्हा आघाडीवर आले आहेत.

Smriti Irani Trailing :  अमेठीमधून स्मृती इराणी पिछाडीवर

अमेठी मतदारसंघातून किशोर लाल शर्मा आघाडीवर आहेत. तर स्मृती इराणी पिछाडीवर आहेत.

lok sabha nivadnuk nikal : मथुरा लोकसभा मतदारसंघातून हेमा मालिनी पुढे; तर मंडीमधून कंगना रणौत पिछाडीवर

मथुरामधून हेमा मालिनी १२,१०० मतांनी पुढे आहे. तर रवि किशन पण ८०९० मतांनी पुढे आहे. कंगना रणौत मंडीमध्ये पिछाडीवर आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून ८७१८ मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून ८७१८ मतांनी आघाडीवर आहेत. याचसोबत राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातूनदेखील पुढे आहेत.

Tamil Nadu : तमिळनाडूत भाजपला मोठा धक्का; अन्नामलाई पिछाडीवर

तमिळनाडूतून भाजपचे उमेदवार अन्नामलाई पिछाडीवर आहे. त्यामुळे भाजपला तमिळनाडूत मोठा धक्का बसू शकतो.

मोठी बातमी! वाराणसीतून नरेंद्र मोदी तब्बल ५ हजार मतांनी पिछाडीवर

वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी तब्बल ५ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राययांनी मोठी आघाडी घेतली आहे.

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी ९ हजार मतांनी आघाडीवर

रायबरेलीतून राहुल गांधी जवळपास ९ हजार मतांनी आघाडीवर आहे. त्याचसोबत वायनाडमधूनदेखील राहुल गांधी आघाडीवर आहे.

Uttar Pradesh Loksabha Result : उत्तर प्रदेशात चुरशीची लढत, समाजवादी पार्टीची तब्बल ३५ जागांवर आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या कलांमध्ये समाजवादी पार्टी ३५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे.

Uttar Pradesh Loksabha Election Result :  उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी ४० जागांवर पुढे

निवडणुक आयोगानुसार, उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी ४० जागांवर पुढे आहे.

INDIA VS NDA :  इंडिया आघाडी आणि एनडीएत जोरदार टक्कर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पहिल्या कलांमध्ये इंडिया आघाडी २४३ जागांवर आघाडीवर आहे तर एनडीए २४४ जागांवर आघाडीवर आहे.

lok sabha nivadnuk nikal : हमिरपूर मतदारसंघातून अनुराग ठाकूर ६४९२ मतांनी आघाडीवर

हिमाचल प्रदेशमधील हमिरपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. अनुराग ठाकूर जवळपास ६४९२ मतांनी पुढे आहेत. हमिरपूर मतदारसंघातून अनुराग ठाकुर ६४९२ मतांनी आघाडीवर आहेत.

इंडिया आघाडीने पार केला २००चा आकडा

लोकसभा निवडणुकांच्या सुरुवातीच्या कलामध्ये इंडिया आघाडीने २०० चा आकडा पार केला आहे. त्यांनी २२० जागांवर आघाडी मिळवली आहे.तर एनडीए २६५ जागांवर आघाडीवर आहे.

निवडणूक निकालापूर्वी विक्रमादित्य सिंग यांनी घेतले हनुमानाचे दर्शन

मंडी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विक्रमादित्य सिंग यांनी निकालापूर्वी आईसोबत हनुमान मंदिराचे दर्शन घेतले. त्यांनी शिमला मधील हनूमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.

छिंदवाडामधून नकुलनाथ पिछाडीवर

छिंदवाडा येथून कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ पिढाडीवर आहेत. येथे भाजपचे विवेक साहू बंटी आघाडीवर आहेत.

गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह ७३११ मतांनी आघाडीवर

गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह आघाडीवर आहेत. अमित शाह ७३११ मतांनी पुढे आहेत.

कोटामध्ये भाजप पिछाडीवर; काँग्रेसचे प्रल्हाद गुंजल आघाडीवर

कोटामध्ये निवडणुकांच्या पहिल्या कलामध्ये राजस्थानमधील कोटा लोकसभातील ओम बिरला पिछाडीवर आहे तर कॉग्रेंसचे प्रल्हाद गुंजल आघाडीवर आहे.

मंडी मतदारसंघातून कंगना रणौत 2000 मतांनी आघाडीवर

सुरुवातीच्या कलामध्ये, हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौत 2000 मतांनी आघाडीवर आहे. कंगनाची स्पर्धा काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंग यांच्याशी आहे.

वायनाड आणि रायबरेलीतून राहुल गांधी पुढे

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून आघाडीवर आहेत.वायनाड आणि रायबरेलीतून राहुल गांधी पुढे

वाराणसीतून नरेंद्र मोदी आघाडीवर

उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत.

एनडीएने गाठला 205 चा आकडा, इंडिया आघाडीही 123 जागांवर आघाडीवर

देशात लोकसभा निवडणुकींच्या निकालाचे पहिले कल होती आले आहेत. यात एनडीएने २०५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इंडिया आघाडी १२३ जागांवर आघाडीवर आबे.

मंडीमधून कंगना रणौत आघाडीवर

लोकसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल हाती येत आहे. त्यात मंडीमधून कंगना रणौत आघाडीवर आहे. मंडीमधून कंगना रणौत आघाडीवर

पश्चिम बंगालमध्ये १७ जागांवर भाजप आघाडीवर

लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती येत आहे. पश्चिम बंगालमध्ये १७ जागांवर भाजप आघाडीवर आहे.

भाजपची दोनशेहून अधिक जागांवर आघाडी

वाराणसीत लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे. वाराणसीतून नरेंद्र मोदी आघाडीवर आहे. गोरखपूर विधानसभामध्ये रवि किशन आघाडीवर आहेत. सध्या भाजप दोनशेहून अधिक जागांवर आघाडीवर आहे.

तिरुवनंतपुरममधून शशि थरुर पिछाडीवर तर रायबरेलीतून राहुल गांधी आघाडीवर

तिरुवनंतपुरममधून शशि थरूर पिछाडीवर आहेत तर रायबरेलीतून राहुल गांधी आघाडीवर आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचा पहिला कल हाती येत आहे. त्यात एनडीए १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी ९१ जागांवर पुढे आहे. तिरुवनंतपुरममधून शशि थरुर पिछाडीवर तर रायबरेलीतून राहुल गांधी आघाडीवर

अमेठीमधून स्मृती इराणी आघाडीवर तर गांधीनगरमधून अमित शाह आघाडीवर

गुना येथून ज्योतीरादित्य सिंधिया आघाडीवर आहे, तर अमेठीमधून स्मृती इराणी आघाडीवर आहेत. गांधीनगरमधून अमित शाह आघाडीवर आहेत. तर वायनाड आणि रायबरेलीमधून राहुल गांधी आघाडीवर आहेत.

बिहारमधून सारण लोकसभा मतदार संघातून लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य पिछाडीवर

बिहारमधून लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य पिछाडीवर आहे. देशातील लोकसभा निवडणुकांच्या निकालासाठी मतमोजणी सुरु झाली आहे.

देशभरात ४५ जागांवर एनडीएची आघाडी तर ३८ जागांवर इंडिया आघाडी पुढे

लोकसभा निवडणुकांचे पहिले कल हाती येत आहे. त्यात एनडीएची आघाडी असल्याचे दिसत आहे. एनडीए ४५ जागांवर तर इंडिया आघाडी ३८ जागांवर आघाडीवर आहे.

वायनाडमधून राहुल गांधी, तर कन्नौजमधून अखिलेश यादव आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यात निकालाचे पहिले कल हाती येत आहे. वायनाडमधून राहुल गांधी आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर कन्नौजमधून अखिलेश यादव आघाडीवर आहेत.

देशात मतमोजणीला सुरुवात; पहिला कल आला समोर; भाजप ८ तर इंडिया ६

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला देशभरात सुरुवात झाली आहे. देशातील निकालाचा पहिला कल समोर आला आहे. त्यात भाजप ८ तर इंडिया आघाडी ६ जागांवर आघाडीवर आहे.

Lok Sabha Election 2024 Results Live: मतपत्रिकेवरून मतमोजणी सुरू  

आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी सकाळी ८ वाजता स्ट्राँग रूम सुरू झाल्या आहेत. सर्वप्रथम मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. पहिल्या एक तासासाठी बॅलेट पेपरच्या मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएम उघडले जातील आणि जनतेचा आदेश दिसू लागेल. संध्याकाळपर्यंत 18 व्या लोकसभेतील सदस्य आणि नवीन सरकारचे चित्र स्पष्ट होईल.

Delhi Lok Sabha Election 2024 Results Live: काँग्रेसकडूनही निकालाआधी विजयाचा जल्लोष;  कार्यकर्त्यांसाठी छोले भटुरेंची तयारी सुरू  

काँग्रेस कार्यालयात छोले भटुरे करण्यात येत आहेत. दिल्लीतील भाजप कार्यालयानंतर केंद्रीय काँग्रेस कार्यालयाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये कार्यालयात कार्यकर्त्यांसाठी छोले-भटुरे तयार केले जात आहेत. निकालाबाबत पक्ष कार्यालयात विशेष तयारी सुरू आहे.

Delhi Lok Sabha Election 2024 Results Live:  निकालाआधी भाजप कार्यालयाबाहेर होम सुरू 

नवी दिल्लीमध्ये भाजप कार्यालयाबाहेर होम सुरू आहे. केदारनाथवरून आलेल्या ब्राम्हणांकडून पूजा सुरू आहे. भाजप ४०० पार जावं, यासाठी होमहवन करण्यात येत आहे.

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024 Results Live:  मध्य प्रदेश लोकसभेचा आज निकाल, मतदारांचा कौल कुणाला?

मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्यात मतमोजणीपूर्वी स्ट्राँग रूम उघडली जात आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

Chhattisgarh Lok Sabha Election 2024 Results Live:  छत्तीसगडमध्ये भाजपकडून विजयाची जय्यत तयारी; २०१ किलो लाडू तयार  

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये भाजपने विजयाच्या उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. २०१ किलो लाडू तयार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ललित जयसिंग म्हणाले की, आम्ही २०१ किलो लाडू वाटण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही ११ प्रकारचे लाडू ऑर्डर केले आहेत. दुपार ते रात्री ११ वाजेपर्यंत लाडू वाटणार आहोत. सिंग म्हणाले, बेसनाचे लाडू, मैदा, नारळ, चॉकलेट आणि बुंदीचे लाडू आहेत. संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाची लाट आहे. पीएम मोदींनी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आम्हाला विश्वास आहे की, भाजप ४०० हून अधिक जागा जिंकेल आणि प्रचंड बहुमताने विजयी होईल.

Tamil Nadu Lok Sabha Election 2024 Results Live:  तामिळनाडू लोकसभा निवडणुकीचा आज निकाल; मतमोजणी काही वेळातच सुरू होणार

शिवगंगा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कार्ती चिदंबरम शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडी येथील मतमोजणी केंद्रावर पोहोचले आहेत . लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही वेळातच सुरू होणार आहे.

Delhi Lok Sabha Election 2024 Results Live: दिल्लीत भाजपकडून निकालाआधीच विजयाचा जल्लोष; मिठाई बनवण्याचं काम सुरू

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. निकालापूर्वी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पुरी आणि मिठाई बनवली जात आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. कार्यालयाच्या आत झपाट्याने खाद्यपदार्थ आणि मिठाई दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 Results Live: निवडणूक निकालाआधीच दिल्लीत झळकले शिवसेना ठाकरे गटाचे बॅनर

दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या निकालआधीच खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. राजधानी दिल्लीतील महादेव रोडवर बॅनर लागले आहेत. विनायक राऊत यांना ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा, असं म्हणत युवासेनेकडून बॅनर लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात अनेक खासदारांचे बॅनर लागल्यानंतर राजधानी दिल्लीत देखील महाराष्ट्राच्या खासदारांचे बॅनर लागले आहेत. विनायक राऊत तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार की नारायण राणे जिंकणार याकडे लक्ष लागलेलं आहे.

Haryana  Lok Sabha Election 2024 Results Live: हरियाणात कोण मारणार बाजी?  थोड्याच वेळात मजमोजणीला होणार सुरूवात

हरियाणातील जिंद येथील मतमोजणी केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

Jammu Kashmir Lok Sabha Election 2024 Results Live: जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीचा आज निकाल; मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीचा आज निकाल आहे. त्या पार्श्वभूमीवर कठुआमधील मतमोजणी केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

West Bengal Lok Sabha Election 2024 Results Live:  पश्चिम बंगाल लोकसभेचा आज निकाल; मतदारांचा कौल कुणाला

पश्चिम बंगालमधील पुर्बा मेदिनीपूर येथील मतमोजणी केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

Odisha Lok Sabha Election 2024 Results Live: ओडिसामध्ये मतदारांचा कौल कुणाला? मतमोजणी केंद्रावर सुरक्षा वाढवली

ओडिशातील भुवनेश्वर येथील मतमोजणी केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

Uttar Pradesh  Lok Sabha Election 2024 Results Live : उत्तरप्रदेश लोकसभा निवडणुकीचा आज निकाल, मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर केला जाणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यापार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

Lok Sabha Election 2024 Exit polls : लोकसभा २०२४ निवडणुकीत कुणाला मिळणार बहुमत? एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?

निवडणुकीच्या मतदानापूर्वी एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहे. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएला बहुमत मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीएला ५४३ जागांपैकी किमान ३५० जागा मिळतील, असा अंदाज ५ एक्झिट पोल्सनी काढला आहे विरोधी आघाडी 'इंडिया'ला केवळ १२० जागा मिळू शकतात, असंही एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे.

Lok Sabha Election 2024 Results Live : लोकसभा २०२४ निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया कशी असेल? जाणून घ्या...

लोकसभा २०२४ निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया कशी असेल याबाबत निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली. देशभरातील ६४ कोटींहून अधिक लोकांनी मतदानाच हक्क बजावल्याची माहितीही त्यांनी दिली. यात महिला मतदारांची संख्या ३१ कोटींहून अधिक असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. मतमोजणीसाठी देशभरात १० लाख ५० बूथ असून एका हॉलमध्ये १४ टेबल असतील. ८ हजारांहून अधिक उमेदवार आहेत, त्यांचे पोलिंग एजंटही असतील. या बुथवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

Lok Sabha Election 2024 Results Live : लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल कुठे पाहता येईल? जाणून घ्या..

लोकसभा निवडणुकांचे निकाल तुम्हाला निवडणूक आयोगाच्या साईट्सवर पाहता येतील. याशिवाय. तुम्ही 'साम टीव्ही' मराठीवर देखीव निवडणुकांचे लाईव्ह निकाल पाहू शकता. साम टीव्हीवर आज दिवसभर मतमोजणीची प्रत्येक अपडेट तुम्हाला लाईव्ह येईल. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही साम टीव्हीची वेबसाइट https://saamtv.esakal.com/ ला भेट देऊ शकता. यावर तुम्हाला मतमोजणीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट्स मिळतील.

India Lok Sabha Election 2024 Results Live : देशात नरेंद्र मोदी की राहुल गांधी, लोकसभा निवडणुकांचे आज निकाल

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. एकूण ५४३ जागांसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. देशात पुन्हा भाजप प्रणित एनडीएचं सरकार येणार की? इंडिया आघाडीला मोठं यश मिळणार याकडे सर्वांच्या नजरा असतील. भाजपने यंदाच्या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. तर विरोधकांनी संविधानाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज जनतेचा कौल कुणाला असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

Uddhav Thackeray :...तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडल्यास मला विचारा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

Maharashtra News Live Updates: मुंबादेवी मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?

SCROLL FOR NEXT