India advisory for citizens in Iran : इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष आता स्फोटक वळणावर आल्याची स्थिती झाली आहे. इराणची राजधानी तेहरानवर अमेरिकेकडून मोठा लष्करी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. या युद्धाच्या सावटामुळे मोदी सरकारने इराणमधील भारतील नागरिकांना महत्त्वाच्या आपत्कालीन सूचना जारी केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत इराण देश सोडा, अस इशारा मोदी सरकारकडून इराणमधील भारतीय नागरिकांना दिला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाकडून याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.
भारतीय दूतावासाने जारी केलेल्या या आपत्कालीन सूचनेमुळे (Advisory) इराणमधील भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेच्या हालचाली आणि इराणची आक्रमक पवित्रामुळे युद्धाची स्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे पुढील काही तास निर्णायक ठरणार आहेत.
इराणमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता. येथे असलेले सर्व भारतीय नागरिक, विद्यार्थी, पर्यटक, व्यावसायिक आणि यात्रेकरू यांनी तात्काळ इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींनी (PIOs) अत्यंत सावधगिरी बाळगावी. आंदोलने किंवा निदर्शने होत असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे. सर्वांनी आपले पासपोर्ट आणि इतर ओळखपत्रे (IDs) सोबत आणि तयार ठेवावीत. स्थानिक माध्यमांच्या बातम्यांवर लक्ष ठेवा आणि कोणत्याही मदतीसाठी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा, असे आवाहन दूतावासाकडून करण्यात आलेय.
इराणमध्ये असणाऱ्या काही भारतीयांनी अद्याप दूतावासाकडे नोंदणी केलेली नाही. त्यांनी तात्काळ दूतावासाकडे आपली नोंदणी करावी. त्यासाठी https://www.meaers.com/request/home या लिंकचा वापर करावा. इराणमध्ये इंटरनेटची समस्या असल्यास भारतातील त्यांच्या नातेवाईकांनी ही नोंदणी करावी, असे आवाहन दूतावासाकडून करण्यात आले आहे. भारतीय दूतावासाकडून इराणमधील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. +989128109115, +989128109109, +989128109102, +989932179359 या हेल्पलाइनवर अथवा cons.tehran@mea.gov.in या मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन दूतावासाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.