bullet train first look  Saam tv
देश विदेश

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

bullet train first look : बुलेट ट्रेनचा फोटो समोर आला आहे. रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेनची डिझाइन सार्वजनिक केली आहे.

Vishal Gangurde

बुलेट ट्रेनचं स्वप्न उतरणार सत्यात

बुलेट ट्रेनची डिझाइन सार्वजनिक

रेल्वे मंत्रालयाने शेअर केला फोटो

भारतीयांचं बुलेट ट्रेनचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. भारतीय रेल्वेकडून देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची डिझाइन सार्वजनिक करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेनच्या डिझाइनचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो अधिकृत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बुलेट ट्रेनमुळे भारतीयांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. बुलेट ट्रेनमुळे भारतीयांचा फक्त प्रवास जलद होणार नसून भारताचं स्थान जगात बुलेट ट्रेन असलेल्या मोजक्या देशांच्या यादीत नोंदवलं जाणार आहे.

मुंबईहून अहमदाबादपर्यंत बुलेट ट्रेन धावणार

भारतातील ५०८ किलोमीटरचा हा मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. ही बुलेट ट्रेन महाराष्ट्र, गुजरात, दादरा - नगर हवेली मार्गाने जाणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण १२ स्टेशन असणार आहेत. यात मुंबई, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलीमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमतीचा समावेश आहे.

रेल्वेच्या माहितीनुसार, गुजरातच्या ८ स्टेशनचं बांधकाम पूर्ण झालं आहे. तर महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोइसरमध्ये वेगाने बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनवर खोदकामाचं काम पूर्ण झालं आहे. या व्यतिरिक्त समुद्रातून जाणाऱ्या सुरुंगाचं काम वेगाने वाढत आहेत.

हाय स्पीड ट्रेन मेक इंडियाच्या अंतर्गत काम सुरू आहे.चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी आणि बेंगळुरूची BEML मिळून ट्रेन सेट विकसित करत आहे. या बुलेट ट्रेनचा वेग २८० किलोमीटर प्रति तास असणार आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबादचा प्रवास काही तासांत पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Tourism : मुंबईजवळचं ठाणे पावसाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर, वीकेंडला नक्की फिरा 'ही' ठिकाणे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

SCROLL FOR NEXT