Pakistan on Global Trial saam tv
देश विदेश

India Pakistan Tension: 33 देशात पाकच्या दहशतवादाचा बुरखा फाडणार,अमेरिका मिशन शशी थरुरांच्या गळ्यात

Global Mission: भारत आता 33 देशात जाऊन पाकच्या दहशतवादाचा बुरखा फाडणार आहे. त्यासाठी 51 खासदारांचं सर्वपक्षिय शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय. या शिष्टमंडळात कोण असणार आहेत आणि हे शिष्टमंडळ नेमकं काय करणार आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Omkar Sonawane

पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर भारत आतंरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. 33 देशात जाऊन पाकच्या दहशतवादाचा बुरखा फाडणार आहेत. त्यासाठी 59 जणांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय. त्यात 51 खासदार आणि आठ राजदूत आहेत. 31 एनडीएचे आणि 20 इतर पक्षांचे खासदार आहेत. ज्यात 3 काँग्रेस नेते आहेत. प्रत्येक गटात एका खासदाराला नेता बनवण्यात आले आहे. प्रत्येक गटात 8 ते 9 सदस्य आहेत. सर्व शिष्टमंडळांमध्ये किमान एक मुस्लिम प्रतिनिधी ठेवण्यात आला आहे.

हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देईल. तेथे ते ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर भारताची भूमिका मांडेल. शिष्टमंडळ 23 किंवा 24 मे रोजी मिशनसाठी प्रस्थान करतील, अशी शक्यता आहे.

कोण नेतृत्व करणार?

गट 1 चे नेतृत्व भाजप खासदार बैजयंत पांडा,

गट 2 चे नेतृत्व भाजपचे रवीशंकर प्रसाद

गट 3 चे नेतृत्व जेडीयूचे संजय कुमार झा

गट 4 चे नेतृत्व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे

गट 5 चे नेतृत्व शशी थरूर

गट 6 चे नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोळी

गट 7 चे नेतृत्व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याक़डे अमेरिकेसह 5 देशांमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व असणार आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर सातत्यानं हल्लाबोल करणारे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचाही शिष्टमंडळात समावेश आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रे पुरवून पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे, अशी टीका ओवेसींनी केली आहे.

आतंरराष्ट्रीय स्तरावर पाकची कोंडी करणार

भारताचा पाकवर 'डिप्लोमॅटिक स्ट्राईक'

शिष्टमंडळ पाकचा दहशतवाद जगासमोर मांडणार

असुद्दीन औवेसी, खासदार, एमआयएम

काँग्रेसने केंद्राला 4 नेत्यांची नावे शिष्टमंडळात समाविष्ट करण्यासाठी दिली होती. त्यातून फक्त आनंद शर्मा यांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. भारताच्या या डिप्लोमॅटिक स्ट्राईकने पाक विरोधात आंतराराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढणार आहे. पाकचा दहशतवादी चेहरा जगासमोर येणार आहे. भारताच्या शत्रूराष्ट्रांना हा कडक इशारा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT