India Corona Updates Saam Tv
देश विदेश

India Corona Updates: देशात 24 तासांत 3,993 नवीन रुग्णांची नोंद; 108 जणांचा मृत्यू

भारतात एका दिवसात कोविड-19 (Covid-19) ची 3,993 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत, जी गेल्या 662 दिवसांतील संसर्गाची सर्वात कमी संख्या आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारतात एका दिवसात कोविड-19 (Covid-19) ची 3,993 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत, जी 662 दिवसांतील संसर्गाची सर्वात कमी संख्या आहे. यासह, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,29,71,308 वर पोहोचली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 49,948 वर आली आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry Of Health) अद्ययावत आकडेवारीनुसार, 108 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 5,15,210 वर पोहोचली आहे.

तर, उपचाराधीन रुग्णांची संख्या कोरोनाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.12 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.68 टक्के आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 4,170 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. संसर्गाचा दैनंदिन दर 0.46 टक्के नोंदवला गेला तर साप्ताहिक संसर्ग दर 0.68 टक्के नोंदवला गेला.

या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या 4,24,06,150 झाली असून मृत्यूदर 1.20 टक्के नोंदवला गेला आहे. देशव्यापी अँटी-कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत (Vaccination Drive), आतापर्यंत 179.13 कोटी डोस देण्यात आले आहेत. उल्लेखनीय आहे की, 7 ऑगस्ट 2020 रोजी देशात बाधितांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT