India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: कोरोना फोफावला! देशात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना आरोग्य विभागासह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना आरोग्य विभागासह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. आज पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 17,070 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, कोरोनाची लागण झालेल्या 23 रुग्णांना मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 5,25,139 वर पोहोचली आहे.

तर 14,413 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. या आजारातून बरे होणार्‍यांची संख्या 4,28,36,906 झाली आहे. तर देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 1,07,189 इतकी झाली आहे, जी संसर्गाच्या एकूण प्रकरणांच्या 0.25 टक्के आहे. तर कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 98.55 टक्के आहे. देशात सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण केरळ राज्यात आहेत. केरळमध्ये 4083 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही वेगानं रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रात 3640 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू

गेल्या 24 तासांत देशात मृत्युमुखी पडलेल्या 23 रुग्णांपैकी 15 रुग्ण हे केरळमधील आहेत. महाराष्ट्रात तीन तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर गंभीर आजारही होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT