India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट; 24 तासांत 1,225 रुग्णांची नोंद, 28 जणांचा मृत्यू

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे. कोविडमुळे लावण्यात आलेनिर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे. कोविडमुळे लावण्यात आलेनिर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. आज एका दिवसात कोविड-19 (Corona Updates) ची 1,225 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशातील कोरोना (Covid-19) बाधितांची संख्या 4,30,24,440 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 14,307 वर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Of Health) गुरुवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, देशात आणखी 28 मृत्यू झाले आहेत त्यामुळे, मृतांची संख्या 5,21,129 झाली आहे.

देशात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 14,307 वर आली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.03 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 397 ची घट झाली आहे. रुग्णांचा राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.76 टक्के आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार, संसर्गाचा दैनिक दर 0.20 टक्के आहे आणि साप्ताहिक दर 0.23 टक्के आहे. आतापर्यंत, देशात कोविड-19 साठी 78.91 कोटींहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे, त्यापैकी गेल्या 24 तासांत 6,07,987 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ता. 19 डिसेंबर 2020 रोजी या केसेसने देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी, 4 मे रोजी, बाधितांची संख्या 20 करोड आणि 23 जून 2021 रोजी ती 3 करोडने पार केली होती. यावर्षी २६ जानेवारीला प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Limbu- Mirchi Impotance: लिंबू- मिरची दारावर का टांगतात?

Shocking: मांडीवरून हात फरवला, नंतर टीशर्टमध्ये हात घातला; धावत्या बसमध्ये तरुणीसोबत भयंकर घडलं, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

BEML Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती; पात्रता काय? वाचा सविस्तर

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT