India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: देशात 24 तासात 22,270 नवे रुग्ण; पॉझिटिव्हिटी रेट 2 टक्क्यांच्या कमी!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारतात शनिवारी 22,270 लोकांना कोरोना विषाणूची (Corona Updates in India) लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकूण कोरोना (Corona) रुग्णांची संख्या 4,28,02,505 वर पोहोचली आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,53,739 वर आली आहे. . केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry Of Health) सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, आज 325 रूग्णांनी आपला जीव गमावला असून मृतांची संख्या 5,11,230 झाली आहे. (Covid 19 News Update News In Marathi)

कोरोना रुग्ण सापडण्याच्या दैनंदिन रुग्णांची संख्या सलग 13 व्या दिवशी एक लाखापेक्षा कमी आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.59 टक्के आहे. कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 98.21 टक्के झाला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 38,353 ची घट नोंदवण्यात आली आहे.

संसर्गाचा दैनंदिन दर 1.80 टक्के होता, तर साप्ताहिक संसर्ग दर 2.50 टक्के नोंदवला गेला. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,20,37,536 झाली आहे. मृत्यू दर 1.19 टक्के आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, कोविड-19 विरोधी लसींचे 175.03 कोटी डोस देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी, 4 मे रोजी, बाधितांची संख्या 2 करोड आणि 23 जून 2021 रोजी 3 करोड ने ओलांडली होती. या वर्षी २६ जानेवारीला या केसेसने चार कोटींचा आकडा पार केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT