Satara, Covid 19
Satara, Covid 19 Saam Tv
देश विदेश

India Corona Update : कोरोनाचा धोका कायम; रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 24 तासांत 12,591 नव्या रुग्णांची नोंद

Shivani Tichkule

News Delhi: भारतातील कोरोना व्हायरच्या संसर्गाच्या वेगाने सरकारसोबतच नागरिकांची चिंता वाढवली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशभरात सध्या कोरोनाने भीषण रूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात मोठ्यासंख्येने कोरोना रुग्ण आढळले आहेत.  (Latest Marathi News)

देशात गेल्या २४ तासात12 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासात 12,591 नवीन रुग्ण आढळले आहेत, जी कालच्या तुलनेत 20 टक्क्यांनी जास्त आहे. कोरोनाचा (Corona) दैनिक सकारात्मकता दर 5.46 टक्के आहे. गेल्या 24 तासात 10,827 लोक बरे झाले आहेत, त्यानंतर कोरोनामधून (Corona Update) बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 4,42,61,476 झाली आहे.

सध्या देशभरात कोरोनाची एकूण 65,286 सक्रिय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे, दिल्लीत (Delhi) गेल्या 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 1,767 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे, जी कालच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

मुंबईत किती रुग्ण

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1,100 नवीन रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 81,58,393 झाली आहे, तर एकूण मृतांची संख्या 1,48,489 झाली आहे. तर राज्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6,102 झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT