ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल लोकांची जीवनशैली खूपच बदलत चालली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे, पचनाशी संबधित समस्या वाढत आहे.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो, जाणून घ्या.
कधीकधी तुम्ही कोणते अन्नपदार्थ खाता यावर पचनाची गती अवलंबून असते.
आपण जे काही खातो ते पचवण्यासाठी साधारणपणे 10 ते 72 तास लागतात.
लहान मुले आणि वृद्ध लोकांमध्ये पचनक्रिया मंद असू शकते.
फळे किंवा भात यांसारखे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ पचायला 2-3 तास लागतात.
जर तुम्ही फॅटयुक्त पदार्थ जसे की काजू किंवा तळलेले पदार्थ खाल्ले तर ते पचण्यास 6 ते 8 तास लागतात.