ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना अंघोळ करताना लूफा वापरण्याची सवय असते.
स्कीन स्वच्छ आणि एक्सफोलिएट करायला लूफाचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेवर जखम होऊ शकते.
प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
प्लास्टिकचा लूफा वापरल्याने फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
अनेकदा लोक लूफाचा वापर करुन ते बाथरुममध्येच सुकवतात. ज्यामुळे लूफामध्ये बॅक्येरिया जमा होतात.
जर तुम्ही प्लास्टिकचा लूफा वापरत असाल प्रत्येक वापरानंतर उन्हामध्ये नक्की सुकवा.
प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर रॅशेज येऊ शकतात. तसेच त्वचेवर खाज सुटणे, किंवा जळजळ होणे यासारख्या समस्या होऊ शकतात.