India Corona Update
India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: टेंशन वाढलं, देशात 24 तासात कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाखांच्या पार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

India Corona Update: नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस आणखी तीव्रतेने होतो आहे. भारतात गेल्या 24 तासात 1 लाख रुग्णांचा आकडा पार केला आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाचे तब्बल 1,17,100 नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत हा आकडा 28.8 टक्क्यांनी अधिक आहे. बुधवारी देशात कोरोनाचे 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. 7 महिन्यांनंतर, भारतात नवीन प्रकरणांची संख्या 1 लाख पार गेली आहे. यापूर्वी 6 जूनला नव्या कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या पुढे गेली होती (India Corona latest update 1 lack 17 thousands new patients found in last 24 hours).

महाराष्ट्रात सर्वाधिक 36,265 कोरोना रुग्ण

देशात आतापर्यंत कोरोना (Corona) चे 3,52,26,383 रुग्ण आढळले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक 36,265 कोरोना रुग्ण आहेत. त्यानंतर, पश्चिम बंगालमध्ये 15,421 प्रकरणे, दिल्लीत 15097 प्रकरणे, तामिळनाडूमध्ये 6983 प्रकरणे, कर्नाटकमध्ये 5,031 प्रकरणे आढळून आली आहेत. भारतातील एकूण प्रकरणांपैकी 67.29% नवीन प्रकरणे या 5 राज्यांमधून आहेत, तर एकूण रुग्णांपैकी 30.97% रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आली आहेत.

24 तासात 302 जणांचा कोरोनाने मृत्यू

तर गेल्या 24 तासात 302 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 4.83 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 221 लोकांचा मृत्यू झाला असून, मृत्यूची ही सर्वाधिक संख्या आहे. याशिवाय बंगालमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रिकव्हरी रेट 97.57% आहे. गेल्या 24 तासात देशात 30,836 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3,43,71,845 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या 3.71 लाखांवर

भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 3.71 लाख झाली आहे. गेल्या 24 तासात 85,962 सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 1,49,66,81,156 लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 94,47,056 डोस घेण्यात आले आहेत.

देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 3000 वर

देशात आतापर्यंत ओमिक्रॉन (Omicron Variant) चे 3007 रुग्ण आहेत. मात्र, यातील 1,199 रुग्ण बरेही झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 876, दिल्लीत 465, कर्नाटकात 333, राजस्थानमध्ये 291, केरळमध्ये 284, गुजरातमध्ये 204 प्रकरणे आहेत. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये 121, हरियाणामध्ये 114, तेलंगणात 107, ओडिशात 60, उत्तर प्रदेशात 31, आंध्र प्रदेशात 28, बंगालमध्ये 27, गोव्यात 19, आसाममध्ये 9, मध्य प्रदेशात 9, उत्तराखंडमध्ये 8 रुग्ण आढळून आले आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

SCROLL FOR NEXT