ISRO Chandrayaan-3 Saam TV
देश विदेश

Chandrayaan-3 Launch Today: भारताचा झेंडा चंद्रावर फडकणार; आज लाँच होणार चांद्रयान- ३, प्रमुख उद्दिष्ट्ये काय?

Chandrayaan-3 Launch On July 14: काही तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान -२ व्यवस्थित चांद्रावर उतरू शकले नाही.

Ruchika Jadhav

Chandrayaan-3 Details: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे चांद्रयान -३ आज लाँच होणार आहे. संपूर्ण भारताचे लक्ष आज चांद्रयान-३ कडे वेधले आहे. आज (१४ जुलै) दुपारी २ वाजून ३५ मिनीटांनी चांद्रयान- ३ आंध्र प्रदेशच्या श्री हरिकोट येथील सतीश धवन आंतरिक्ष केंद्रातून अवकाशात झेपवणार आहे.

चांद्रयान-३ (Chandrayaan-3) इस्रोच्या विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत लॉन्च केलं जात आहे. इस्रोने आतापर्यंत अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. यात मंगलयान, चांद्रयान १, चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ यांचा समावेश आहे. जवळपास ४ वर्षांपूर्वी विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत चांद्रयान २ लाँच करण्यात आलं होतं. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान -२ व्यवस्थित उतरु शकले नाही. त्यामुळे ही मोहीम त्यावेळी अयशस्वी ठरली.

चांद्रयान -३ मोहीम नेमकी कशी आहे?

चंद्रावर जात असलेले ISRO चे चांद्रयान -३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी कुठलेही यान पोहोचलेले नाही. त्यामुळे संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ भारताच्या चांद्रयान- 3 मोहीमेवर लक्ष ठेवून आहेत. चांद्रयान २ मध्ये अपयश मिळाल्यानंतर भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत तंत्रज्ञानात किती पुढे आहे हे दाखवून देण्याची एक मोठी संधी मिळणार आहे.

चांद्रयान -३ लाँन्च झालेली दृश्य कुठे पाहायची?

चांद्रयान -३ आकाशात झेप घेताना पाहण्यासाठी प्रत्येक नागरिक उत्सुक आहे. नागरिकांना देखील आपल्या फोनमध्ये ही दृश्य कैद करायाची आहेत. यासाठी इस्रोने विशेष सुविधा केली आहे. इस्रोच्या वेबसाइटवरुन बुकिंग सुरू आहे. http://www.isro.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही व्यू गॅलरीमध्ये सीट बूक करू शकता. इतकेच नाही तर ज्या व्यक्तींनी सीट बूक केलेली नाही त्यांना इस्रोच्या युट्यूब चॅनलवरुन देखील लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे.

प्रमुख उद्दिष्ट्य

चांद्रयान - ३ चं प्रमुख उद्दिष्ट्य चंद्रावर यशस्वीपणे उतरणे हे आहे. त्यानंतर यातून एक रोवर चंद्रवर उतरणार आहे. या रोवरवर बरेच यंत्र बसवण्यात आलेत. तसेच एचडी कॅमेरा देखील बसवण्यात आला आहे. हे रोवर एकून १४ दिवस उत्तम काम करु शकणार आहे. चंद्रावरील विविध गोष्टींचे आध्यन यातून करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा येणार

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT