Agni 1 Ballistic Missile Launch ANI
देश विदेश

Agni 1 Ballistic Missile Launch: भारताची ताकद आणखी वाढणार, DRDO कडून अग्नी 1 बॅलेस्टिक क्षेपणास्राचं यशस्वी प्रेक्षपण

APJ Abdul Kalam Island: या क्षेपणास्रामुळे भारताची ताकद आणखी वाढली आहे.

Priya More

Agni-1 Missile Launch : भारताने अग्नी 1 बॅलेस्टिक क्षेपणास्राचं (Agni 1 Ballistic Missile) यशस्वी प्रेक्षपण केले आहे. अग्नी 1 हे आंतरखंडिय क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्राचे डीआरडीओने (DRDO) यशस्वी प्रेक्षपण केले. या क्षेपणास्रामुळे भारताची ताकद आणखी वाढली आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक मारा करता येणार आहे.

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने (DRDO) अग्नी-1 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे गुरुवारी यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. गुरुवारी रात्री उशिरा हे प्रक्षेपण करुन चाचणी घेण्यात आली. ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे अग्नी -1 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.

अग्नी- 1 क्षेपणास्रामुळे शत्रू प्रदेशातील लष्करी ठाण्याचा अचूक वेध आता भारताला घेता येणार आहे. यासोबतच शत्रूंच्या हालचाली देखील समजण्यास भारताला मदत होणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते ए. भरतभूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणी दरम्यान क्षेपणास्राच्या सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक मापदंडांनी यशस्वी पडताळणी करण्यात आली. या क्षेपणास्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्र खूप उंचावरुन अत्यंत अचूकतेने लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.

तब्बल 12 टन वजनाचे आणि १५ मीटर लांबीचे हे अग्नी 1 क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्र एक हजार किलोपर्यंतची उपकरणे किंवा स्फोटके वाहून नेऊ शकते. 700 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्राची क्षमता आहे. सॉलिड इंजिनवर आधारित असलेल्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 900 किलो मीटरपर्यंत आहे. दरम्यान, मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये भारताने अग्नी- 5 आणि आण्विक-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

Box Office Collection: 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' निघावला फुसका बार

Nandurbar Accident : धनतेरसला भयानक अपघात, सातपुड्यात भाविकांवर काळाचा घाला, ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

SCROLL FOR NEXT