
US President Joe Biden: चालताना पाय घसरणे आणि खाली पडणे ही फारच सामान्य गोष्ट आहे. मात्र एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीबरोबर असे घडते तेव्हा तो काही प्रमाणात चर्चोचा विषय ठरतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत कालच अशी एक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (President of the United States) गुरुवारी (१ जून) रोजी यूएस एअर फोर्सच्या अकादमीत सहभागी झाले होते. कार्यक्रम आटोपल्यावर जो बायडन आपल्या वाहनाच्या दिशेने निघाले होते. यावेळी स्टेजवर अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते पायऱ्यांवर धाडकन खाली आफटले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्वांनी त्यांना सावरण्यासाठी धाव घेतली आणि त्यांच्या वाहनापर्यंत पोहचवले.
८० वर्षीय बायडन जमिनीवर कोसळले
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे की, यूएस एअर फोर्समध्ये सुरुवातीला बायडन यांचे भाषण झाले. त्यानंतर त्यांनी एका कॅडेटशी हस्तांदोलन केले. व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, हस्तांदोलन करुन कॅडेट तेथून पुढे जातो. त्यानंतर बायडेन देखील तेथून पुढे जाण्यास निघतात. त्यावेळी स्टेजवर त्यांचा पाय अडकून ते खाली पडतात.
बायडन (Joe Biden) खाली पडल्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या राजकारणातील बायडन हे सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत. अशात ते साल २०२४ च्या राष्ट्रपती पदाच्या निवणुकीसाठी देखील इच्छुक आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या तब्येची काळजी वाटत आहे. मात्र काळजी करण्याचे काहीच कारण नसून बायडन यांती प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांना जास्त दुखापत झालेली नाही, अशी माहिती व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.