PM Modi Hugs Joe Biden: पीएम मोदी आणि जो बायडेन यांची गळाभेट, G-7 समिटमधील या Video ची होतेय चर्चा

PM Modi And Joe Biden Hugs Video Viral: मोदी आणि बायडेन यांच्या या गळाभेटीची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
PM Modi Hugs Joe Biden
PM Modi Hugs Joe BidenANI
Published On

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) सध्या जपान दौऱ्यावर आहेत. जपानच्या हिरोशिमा शहरामध्ये जी-7 शिखर परिषद (japan g 7 summit) सुरु आहे. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये पीएम मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना मिठी मारली. मोदी आणि बायडेन यांच्या या गळाभेटीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या या गळाभेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

PM Modi Hugs Joe Biden
PM Modi meets Ukraine President Zelensky: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदींची समोरासमोर पहिलीच भेट, 'या' मुद्द्यावर झाली चर्चा

जपानच्या हिरोशिमामध्ये आंतरराष्ट्रीय जी-7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये अनेक देशांचे राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकिचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये पीएम मोदी यांना बघताच जो बायडेन हे त्यांच्या दिशेने चालत आले. त्यांनी हस्तांदोलन करत मोदींची गळाभेट घेतली. यावेळी त्यांनी एकमेकांची विचारपूस देखील केली. त्यांच्या या भेटीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

जपानमध्ये सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जपानचे पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीने स्वागत केले. त्यानंतर मोदी या बैठकीमध्ये सहभागी झाले. पीएम नरेंद्र मोदी हे जी-7 परिषदेमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी हिरोशिमा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण केले. या परिषदेत जापान आणि अमेरिका या देशांशिवाय ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा आणि इटलीसोबत युरोपीय संघांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पीएम मोदींचा हा जपान दौरा 21 मेपर्यंत असणार आहे.

या शिखर परिषदेमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील सहभागी झाले आहेत. पीएम मोदी यांनी यावेळी त्यांची देखील भेट घेतली. पीएम मोदी आणि ऋषी सुनक यांच्या गळाभेटीचे फोटो देखील समोर आले आहेत. दोघांनीही गळाभेट करत एकमेकांचे स्वागत केले. अशामध्ये पीएम मोदी आणि जो बायडेन यांच्या गळाभेटीच्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पण त्यांची गळाभेट चीनची डोकेदुखी ठरु शकते, असे देखील बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com