India-Canada Tension Saam Tv
देश विदेश

India-Canada Tension: भारत आणि कॅनडामध्ये तणाव, ब्रिटीश पंतप्रधानांचा ट्रुडो यांना फोन, काय झाली चर्चा?

Satish Kengar

Justin Trudeau News:

जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर कॅनडा आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कॅनडाने भारतातील त्यांच्या राजदूतांना दुसऱ्या देशात हलवलं आहे. या सगळ्या दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना फोन केला आहे.

त्यांनी ट्रुडो यांच्याशी फोनवर संवाद साधत भारत आणि कॅनडातील तणाव कमी होईल, अशी आशा व्यक्त केली. खलिस्तानी निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी फोनवर बोलताना नवी दिल्ली आणि ओटावा यांच्यातील तणाव कमी करण्यावर भर दिला. डाउनिंग स्ट्रीट (पंतप्रधानांचे निवासस्थान आणि कार्यालय) एका निवेदनात म्हटले आहे की, सुनक यांनी शुक्रवारी संध्याकाळी ट्रूडोशी फोनव संवाद साधला. यादरम्यान त्यांना भारतातील कॅनडाच्या राजदूतांशी संबंधित परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली आणि दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले.  (Latest Marathi News)

फरार खलिस्तानी समर्थक फुटीरतावादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असल्याचा कॅनडाच्या आरोपानंतर सुनक यांनी ब्रिटनची भूमिका स्पष्ट केली आहे. निवेदनात सांगण्यात आलं आहे की, ''पंतप्रधान सुनक यांनी यूकेच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला की सर्व देशांनी राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कन्व्हेन्शनच्या तत्त्वांसह सार्वभौमत्व आणि कायद्याच्या शासनाचा आदर केला पाहिजे. दोन्ही देशांमधील संबंध लवकरच सुधारतील, अशी अशा त्यांनी व्यक्त केली आहे.''

याबद्दल कॅनडाची राजधानी ओटावा येथून पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, ट्रूडो यांनी कॅनडा आणि भारत यांच्यातील सद्यस्थितीची माहिती सुतक यांना दिली. दोन्ही नेत्यांनी राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कन्व्हेन्शनचा आदर करण्याची आणि त्यांच्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज यावर भर दिला. कॅनडाच्या सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, "पंतप्रधान ट्रूडो आणि पंतप्रधान सुनक यांनी संपर्कात राहण्याचे आणि जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अजित पवारांचे कट्टर समर्थक मोहोळचे माजी आमदार राजन पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला

Maharashtra Politics : झालं 'कल्याण'! निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजप-शिवसेनेत तणाव, अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा

Overcome Laziness: शरीरातील आळस दूर करण्यासाठी 'या' सोप्या टिप्स करा फॅालो

Belapur Crime : पोलीस पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल; बचत गटाच्या नावाने पैसे घेत केली फसवणूक

अंतराळात दिसली रहस्यमयी वस्तू; शास्त्रज्ञंही झाले हैराण

SCROLL FOR NEXT