दिल्लीतील संविधान क्लबमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक
बैठकीत 23 पक्ष आणि एका अपक्ष खासदारासह 24 प्रतिनिधी सहभागी झाले.
2029 लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती, महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर चर्चा
विरोधी पक्षाची इंडिया आघाडीनं तब्बल एका वर्षानंतर महत्त्वाची बैठक घेतली. दिल्लीमधील संविधान क्लबमध्ये झालेल्या या बैठकीत इंडिया आघाडीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या बैठकीत २३ राजकीय पक्ष आणि एक अपक्ष खासदारासह २४ प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता. या बैठकीत २०२९ लोकसभा निवडणूक, निवडणूक पारदर्शकता, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे, विरोधी पक्षातील एकता यावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत बोलताना राहुल गांधींनी विरोधी पक्षांना एका मोलाचा सल्ला दिला. राहुल गांधींचा दृष्टिकोन सकारात्मक आणि आक्रमक असा दोन्ही होता. त्यांनी निवडणुकीतील फसवणुकीचा मुद्दा तीव्रतेने उपस्थित केला. काही सहकारी निवडणुकीतील अनियमितता पक्षपाती मानत असले तरी, त्यांच्या मते ही समस्या खूपच गंभीर आहे. इंडिया आघाडीने "Love and Affection" म्हणजेच प्रेम स्नेह आणि आपआपसांतील सन्मान वाढत पुढे वाटचाल केली पाहिजे.
हीच रीघ ओढत नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्ष उमर अब्दुला म्हणाले की, काँग्रेस इंडिया आघाडीतील पक्षांना जोडून ठेवण्याची भूमिका निभावू शकते. सामुहिक आत्मचिंतनासह २०२९साठी रणनीती तयार केली पाहिजे. पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी सोशल मीडियाच्या वापरावर भर दिला. त्यांनी सोशल मीडिया अधिक प्रभावीपणे वापरला पाहिजे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मत चोरीचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षांना एकतेची गरज आहे. काँग्रेसला सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढे चालावे लागेल. तसेच राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी विरोधी पक्षांनी आतापासूनच २०२९च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली पाहिजे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडी बाबत मोठं भाष्य या बैठकीत केलं. इंडिया आघाडीनं वारंवार बैठका घेतल्या पाहिजेत. ज्यामुळे सर्व पक्षांमधील समन्वय साधून राहील. त्याचबरोबर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रसहित इतर राज्यातील विरोधी पक्षांनी संयुक्तपणे सरकारविरोधात लढा उभारवावा लागेल.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आणि राजकीय स्थितीचा मुद्दा उपस्थित केला. सुत्रांनुसार निवडणूक प्रक्रिया, हिंसा आणि विरोधी पक्षाच्या सुरक्षेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांनी जमिनीवरील संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे. नागरिकांमध्ये जाऊन आपली राजकीय लढाई अधिक तीव्रपणे लढली पाहिजे असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
बैठकीबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. सुरुवातीला ४५० जागांबाबत आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर पक्षबांधणी आणि जनसंपर्क वाढवण्याच्या कामांवर भर दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.