Indian Economy Saam TV
देश विदेश

Indian Economy: भारत जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था, ब्रिटनलाही टाकलं मागे

Indian Economy Latest News: सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर चीन, जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) ही जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. मुख्य म्हणजे ब्रिटन (Britain) देशाला मागे टाकत भारत टॉप ५ मध्ये समाविष्ट झाला आहे. युरोपमधील मंदीच्या काळात देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेने जोरदार उसळी घेतली. भारताने ब्रिटनला मागे टाकले असून ब्रिटन आता सहाव्या स्थानावर आहे. (Indian Economy Latest News)

हे देखील पाहा -

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यूएस डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार, २०२१ च्या शेवटच्या तिमाहीत भारताने यूकेला मागे टाकले आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या GDP डेटानुसार, २०२२ च्या पहिल्या तिमाहीत भारताने आपली वाढ मजबूत केली आहे. अंदाजानुसार, या वाढीसह भारत लवकरच वार्षिक आधारावरही जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे.

भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनपेक्षाही मोठी

मार्च तिमाहीच्या अखेरीस IMF आणि डॉलर विनिमय दराने जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे, ब्लूमबर्गने माहिती दिली आहे की, नाममात्र रोखीत भारतीय अर्थव्यवस्था $ 854.7 अब्ज इतकी होती. त्याच कालावधीत, त्याच आधारावर यूकेच्या अर्थव्यवस्था $816 अब्ज इतकी होती. आगामी काळात भारत ब्रिटिश अर्थव्यवस्थेविरुद्ध आणखी मजबूत होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. किंबहुना, भारतासाठी विकासाचा अंदाज ७ टक्के ठेवण्यात आला आहे. जी जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान आहे. दुसरीकडे, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता आहे. हे पाहता, भारत वार्षिक आधारावर डॉलरच्या मूल्यामध्ये यूकेला मागे टाकून पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज IMFने व्यक्त केला आहे.

भारताचा जीडीपी 20 वर्षात 10 पटीने वाढला

वार्षिक आधारावर, भारताची अर्थव्यवस्था $31.7 ट्रिलियनची आहे आणि यूकेच्या मागे सहाव्या क्रमांकावर आहे. UK चा GDP सध्या $3.19 ट्रिलियन आहे. 7 टक्क्यांच्या अंदाजे वाढीसह, भारत या वर्षीही वार्षिक आधारावर यूकेला मागे टाकण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर चीन, जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. भारताच्या जीडीपीने गेल्या 20 वर्षांत 10 पट वाढ नोंदवली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT