India and Pakistan agreed ceasefire Saam tv
देश विदेश

India and Pakistan agreed ceasefire : भारत-पाकिस्तान युद्धविराम! दोन्ही देशांची तयारी; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

India and Pakistan agreed ceasefire update : भारत-पाकिस्ता या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम होणार आहे. यासाठी दोन्ही देशांची तयारी असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

Vishal Gangurde

India and Pakistan agreed ceasefire : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश तात्काळ प्रभावाने शस्त्रसंधी करण्यास तयार असल्याचा दावा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट केली आहे. रात्री उशिरापर्यंत केलेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्यावर सहमती झाली आहे. याबाबतची घोषणा करताना आनंद होत आहे, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे. त्याचवेळी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तान तात्काळ शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर दीर्घ चर्चा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्यावर सहमती दर्शवली आहे. मला ही घोषणा करताना आनंद होत आहे, असेही ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

भारत सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये गोळीबार आणि सैन्य कारवाया थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा झाली. आज दुपारच्या सुमारास पाकिस्तानी डीजीएमओने सर्वप्रथम चर्चा केली. दीर्घ चर्चेनंतर शस्त्रसंधीवर सहमती झाली.

अमेरिकी परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी सांगितले की, मागील ४८ तासांत उपराष्ट्रपती व्हेन्स आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, असिम मलीक यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही सरकार शस्त्रसंधीसाठी तयार झाले असल्याचे सांगताना आनंद होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शांततेचा मार्ग निवडल्यामुळं पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांचे आम्ही कौतुक करतो, असेही मार्को म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

SCROLL FOR NEXT