Trump’s Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात 'टॅरीफ'ची आयडीया कुठून आली? त्यामागचं डोकं कुणाचं? VIDEO

Who advised Donald Trump on tariff policy: अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क (टॅरिफ धोरण) लागू करण्याची घोषणा केली आहे.
Trump's Tariff
Trump's Tariffsaam tv
Published On

पुणे: आजचा विषय "ट्रम्प इफेक्ट" आहे. माझ्या नवीन मासिकात त्यावर लिहिलं होतं, पण त्यानंतर काही घडत गेलं की त्यावर अजून खूप काही बोलता येईल. कारण सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्या तऱ्हेने वागत आहेत, बोलत आहेत, त्यामुळे स्टँड-अप कॉमेडियन या कलेच्या प्रकारावर संकट येण्याची शक्यता आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया यशस्वी उद्योजक तथा वित्त क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉ. दीपक घैसास यांनी दिली. ते 'सकाळ मनी' कार्यक्रमात बोलत होते. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा आणि किती परिणाम होईल, हे देखील त्यांनी उलडगून सांगितलं.

अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क (टॅरिफ धोरण) लागू करण्याची घोषणा बुधवारी, २ एप्रिल रोजी रात्री उशिरा केली. भारतावर २६ टक्के आयात शुल्क लावण्यात येणार आहे. तर अमेरिकेचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या चीनवर १२५ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका जगभरातील देशांना बसू शकतो. मात्र, टॅरिफचा अर्थव्यवस्थेवर नेमका कसा आणि किती परिणाम होऊ शकतो, याबाबत डॉ. दीपक घैसास यांनी भाष्य केलं.

ते म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्षपद सर्वात प्रबळ मानले जाते, असा अनुभव अमेरिकन लोकांना आतापर्यंत नव्हता. २० दिवसांत काय काय घडलं. पण त्याहून मोठी घटना म्हणजे कोविडनंतरच्या काळात इक्विटी मार्केटमध्ये, किंवा फायनान्शिअल मार्केटमध्ये, हा सर्वात मोठा परिणाम करणारा निर्णय ठरला. २००८ साली मोठी आर्थिक पडझड झाली. त्यानंतर दहा ट्रिलियन डॉलरचं नुकसान केवळ शेअर मार्केटमध्ये झालं आणि त्याचे पडसाद जवळपास संपूर्ण जगभर उमटले. जपानी मार्केटपासून ते भारतापर्यंत. त्यामुळे या घटनेला केवळ प्रसिद्धी मिळालेली नाही, तर जगभरातील प्रत्येकालाच यावर मत मांडावं असं वाटत आहे.

ट्रम्प टॅरिफची ४ भागांत सखोल माहिती

ट्रम्पला हे सगळं करण्यासाठी सल्ला देणारे लोक कोण आहेत? असं त्यांना का सूचलं? हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे. तो मूर्ख माणूस नक्कीच नाही. तो अतिशय हुशार आणि मोठा उद्योजक आहे. पण त्याच्या मागे कोण लोक आहेत? हे जाणून घेणं गरजेचं आहे. नंतर त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे आणि टॅरिफचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे, हेही सांगितलं.

Trump's Tariff
Donald Trump: ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका! टॅरिफमध्ये २६ टक्क्यांनी वाढ; तेल, फोन,सोन्याच्या किंमती महागणार

पुढे ते म्हणाले, यामध्ये सर्वात महत्त्वाचा माणूस आहे एलोन मस्क. सगळ्यांना माहीत असलेला टेस्ला कारमुळे आणि अवकाश मोहिमांमुळे प्रसिद्ध असलेला हा दक्षिण आफ्रिकेचा माणूस, माझ्या मते खूप इंटेलिजंट आहे. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते अशा माणसांमध्ये. पण तो पक्का उद्योजक आहे. त्याने या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला आणि ट्रम्पला सुमारे २७७ मिलियन डॉलर्स डोनेशन दिलं. याशिवाय इतर रिपब्लिकन उमेदवारांना धमकी देऊन सांगितलं की, जर कोणी ट्रम्पविरुद्ध उभं राहिलं, तर मी समोरच्या डेमोक्रॅटिक पक्षाला एवढंच डोनेशन देईल. हेच महत्त्वाचं कारण आहे की ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एलोन मस्क यांचे प्रचंड उपकार आहेत. ट्रम्प निवडून आल्यानंतर त्याच्या स्वतःच्या मूल्यामध्ये १७० बिलियन डॉलरची वाढ झाली.

Trump's Tariff
Donald Trump: ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका! टॅरिफमध्ये २६ टक्क्यांनी वाढ; तेल, फोन,सोन्याच्या किंमती महागणार

यामध्ये दुसरा महत्त्वाचा माणूस म्हणजे पीटर नवारो. हा पीटर अतिशय इंटेलिजंट आहे. मागच्या काळातही यानेच ट्रम्प यांना टॅरिफ वाढवण्याचा सल्ला दिला होता. पण त्यावेळी त्याचा गवगवा झाला नव्हता, ते गुपचूप वाढवले होते. तसेच स्टीफन मिरन नावाचाही एक आहे. अशी दोन-तीन माणसं ट्रम्प यांना टॅरिफवर सल्ला देत आहेत. आणि ही टीम आताच बनलेली नाही, ती आधीपासून त्यांच्यासोबत आहे. आत्ता ट्रम्पसोबत असलेली सगळी टीम ही बिलियनेअर्सची आहे. त्यापैकी बहुतेकांनी ट्रम्पला डोनेशन दिलं आहे आणि प्रचाराला मदत केली आहे

अमेरिकेची अर्थव्यवस्था साधारण ३० ते ३२ ट्रिलियन डॉलरची आहे. अमेरिका सर्वाधिक लक्ष केंद्रित करते डिफेन्सवर. त्यांची डिफेन्स इंडस्ट्री स्ट्राँग आहे. त्यामुळे जगात कुठेही युद्ध चालू राहणं हे अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांचा माल युद्धामध्ये देखील खपतो आणि युद्धाच्या भीतीमुळे आणखीन जास्त खपतो. त्यामुळे कार किंवा मोबाइल मॅन्युफॅक्चर झाले नाहीत, तरी अमेरिकेला विशेष फरक पडत नाही.

मात्र या सगळ्यानंतर काही वर्षांनी जगाचा अमेरिकेवर हळूहळू विश्वास कमी होत जाईल. कारण प्रत्येक चार वर्षांनी अध्यक्ष बदलणार, त्यांचे सल्लागार कोण असणार, यासारखे अनेक प्रश्न जगाला पडत आहेत. त्यामुळे भविष्यात जगातील देश अमेरिकेवर अवलंबून राहणार नाहीत, असं मत डॉ. घैसास यांनी व्यक्त केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com