India Alliance Latest News Saamtv
देश विदेश

India Alliance Latest News: 'इंडिया' आघाडीची मध्य प्रदेशमधील नियोजित सभा रद्द; काय आहे नेमकं कारण?

India Alliance Latest News: इंडिया आघाडीची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणारी पहिली सभा रद्द करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

India Alliance latest News:

इंडिया आघाडीची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणारी पहिली सभा रद्द करण्यात आली आहे. काही तासांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत महिती दिली आहे. सभा रद्द करण्यात आल्याने आघाडीत सर्व ठीक आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी काही तासांच्या बैठकीत ठरवण्यात आलं होतं की, निवडणूक असलेल्या राज्यात इंडिया आघाडीची पहिली मोठी रॅली करण्यात येईल. याबाबतची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते वेणुगोपाल यांनी दिली होती.

दरम्यान, आता कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे की, 'मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या त्यांच्याशी बोलणं सुरू आहे'.

एका वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या काँग्रेसने रॅलीची तयारी पूर्ण केली नव्हती. कमी वेळेत त्यांना मोठ्या रॅलीची तयारी करायची होती. त्यामुळे त्यांच्यापुढं मोठं आव्हान होतं. यामुळे भोपाळमधील रॅली रद्द करण्यात आली असं बोललं जात आहे. विरोधकांकडून भोपाळच्या सभेवरून स्पष्टीकरण देणे सुरू आहे. मात्र, भाजपने याचा मुद्दा करत टीका करणे सुरू केलं आहे.

इंडिया आघाडीकडून काही वृत्त वाहिन्या आणि न्यूज अँकर्सवर बहिष्कार

तत्पर्वी, इंडिया आघाडीने भाजप विरोधात कंबर कसली आहे. इंडिया आघाडीत आतापर्यंत २८ पक्ष एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीने आतापर्यंत वेगवेगळे ठराव निश्चित केले आहेत. इंडिया आघाडीने काल काही वृत्त वाहिन्या आणि न्यूज अँकर्सवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. बहिष्कार घालण्यात आलेल्या अँकर्स आणि वृत्त वाहिनीची यादी प्रसिद्ध केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Kidney Health: आजच '१' पांढरा पदार्थ खाणं बंद करा; किडनी फेलचा धोका वाढतो.. तज्ज्ञ सांगतात...

Dhaba Style Chiken Curry: ढाबा स्टाईल चिकन करी घरी बनवण्याची सोपी पद्धत

Shegaon Crime : आठवडे बाजाराच्या गर्दीत गाठत युवकाची हत्या; खळबळजनक घटनेने शेगाव हादरले

Box Office Collection : 'थामा' की 'एक दीवाने की दीवानियत' वीकेंडला कोणता चित्रपट हाऊसफुल? वाचा कलेक्शन

SCROLL FOR NEXT