केंद्र सरकारच्या डिलिमीटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकाला INDIA आघाडीने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी ही माहिती दिली. हे विधेयक लोकशाहीसाठी मोठा धोकादायक असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीच्या हितांकडे या विधेयकात दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा खरगे यांनी केला.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, INDIA आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेऊन डिलिमीटेशन विधेयकला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारला लोकशाही संपवून संपूर्ण सत्ता स्वतःच्या हातात घ्यायची आहे. मागील लोकसभा संपवून संपूर्ण सत्ता स्वतःच्या हातात घ्यायची आहे, मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. आता जागांची संख्या वाढवून 800 पारचा नारा दिला जात आहे. या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्तेत राहायचे असल्याचा आरोप खरगे यांनी केला.
विधेयकात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या हितांचा विचार करण्यात आलेला नाही, असं खरगे म्हणाले. संविधानानुसार SC-ST समाजासाठीच्या जागांमध्ये वाढ होणं अपेक्षित आहे. मात्र, प्रस्तावित विधेयकात त्याबाबत कोणतीही तरतूद नसल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी खरगे यांनी भाजपवर विरोधी पक्षांमध्ये फूट पाडल्याचाही आरोप केला. यापूर्वी विधेयक आणताना सरकारकडे आवश्यक संख्याबळ नव्हतं. मात्र, आता तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारख्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर सरकारने संसद अधिवेशन बोलावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.