TMC vs Congress Saam Tv
देश विदेश

TMC vs Congress: काँग्रेसच्या या नेत्यामुळे ममता बॅनर्जी यांनी घेतली टोकाची भूमिका; TMC नेत्याने स्पष्टच सांगितलं

India Alliance News: तृणमूल काँग्रेसने काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना काँग्रेससोबत जागावाटपावर सहमती न होण्याचे कारण सांगितले आहे.

Satish Kengar

TMC vs Congress:

इंडिया आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना काँग्रेससोबत जागावाटपावर सहमती न होण्याचे कारण सांगितले आहे. अलीकडेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत जागावाटप करण्यास नकार दिला होता.

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी गुरुवारी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि त्यांचा पक्ष यांच्यातील युती न होण्यासाठी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी जबाबदार आहेत. यातच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष राज्यात लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अधीर रंजन चौधरी यांच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये युती होऊ शकली नाही, असा दावा ओब्रायन यांनी केला. ते म्हणाले की 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स'चे (इंडिया) अनेक टीकाकार आहेत. मात्र यात फक्त भाजप आणि चौधरी यांनीच युतीच्या विरोधात वारंवार विधाने केली आहेत. (Latest Marathi News)

ओब्रायन यांनी पत्रकारांना सांगितले की, 'सार्वत्रिक निवडणुकांनंतर जर काँग्रेसने आपले काम केले आणि भाजपला मोठ्या संख्येने पराभूत केले, तर तृणमूल काँग्रेस संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या आघाडीमध्ये पूर्णपणे सहभागी होईल आणि त्यासाठी लढा देईल.

पश्चिम बंगालमध्ये पोहोचली भारत जोडो न्याय यात्रा

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेने आसाममधील गोलकगंज मार्गे राज्यातील प्रवासाची सांगता केली आणि गुरुवारी सकाळी पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला. आसाममधील गौरीपूर येथे रात्रीच्या मुक्कामानंतर राहुल गांधी यांनी राज्यातील त्यांच्या दौऱ्याच्या आठव्या आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात आधी कारने आणि नंतर गोलकगंजला जाण्यासाठी बसमध्ये चढले.

मिळालेल्या माहितीनुसार 27 जानेवारीला दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ही यात्रा जलपाईगुडी, अलीपुरद्वार, उत्तर दिनाजपूर आणि दार्जिलिंग जिल्ह्यांतून 29 जानेवारीला बिहारमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर ही यात्रा 31 जानेवारीला मालदा मार्गे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा प्रवेश करेल आणि मुर्शिदाबादमधून जाईल आणि 1 फेब्रुवारीला राज्यातून निघेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT