Massive explosions seen at Iran’s Dezful airbase following a joint US-Israel airstrike. AI
देश विदेश

महाभयंकर घडणार! 48 तासांचा अलर्ट, ट्रम्पच्या इशाऱ्यानंतर भारताचा मोठा निर्णय; इराणमधील भारतीयांसाठी advisory, जगभरात खळबळ

Iran crisis Indians advisory : इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने नागरिकांना पुढील ४८ तास घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

India advisory for citizens in Iran 48 hour warning details: अमेरिकेने इराणला ४८ तासांची मुदत (डेडलाइन) दिल्यानंतर आखाती देशांतील परिस्थिती अधिकच चिघळल्याचे चित्र आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इराणने माघार घेण्यास नकार दिला आहे. अमेरिकेची मुदत संपण्यापूर्वीच इराणकडून हल्ले सुरू झाले, त्यामुळे युद्धाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. इराण-अमेरिका यांच्यातील या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पुढील ४८ तास घराबाहेर न पडण्याची सूचना भारतीयांना देण्यात आली. त्याशिवाय जिथे आहात तिथेच थांबण्याचे निर्देश इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना दिले आहेत. दूतावासाने यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत.

जिथे आहात तिथेच राहा, बाहेर पडू नका

इराणमधील भारतीय दूतावासाने तेथील भारतीयांसाठी आज महत्त्वाची सूचना जारी केली. "पुढील ४८ तास जिथे आहात तिथेच थांबावे," असे भारतीयांना सांगण्यात आले आहे. लोकांनी घरातच राहावे आणि इमारतींच्या वरच्या मजल्यावर जाणे टाळावे. तसेच सर्व विद्युत व लष्करी आस्थापनांच्या जवळ जाणे टाळावे. हॉटेलमध्ये राहणाऱ्यांनी दूतावासाशी नियमित संपर्कात राहावे आणि कोणीही बाहेर पडू नये, असे या सूचनेत म्हटले आहे.

दूतावासाने प्रसिद्धीपत्रकात नेमके काय म्हटले आहे?

सध्या इराणमध्ये असणाऱ्या भारतीयांनी पुढील ४८ तासांसाठी जिथे आहे तिथेच राहावे. सर्व विद्युत केंद्रे, लष्करी ठिकाणे आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यावर जाणे टाळावे. घरातच राहावे आणि महामार्गावरील कोणत्याही प्रवासासाठी केवळ दूतावासाच्या समन्वयानेच हालचाल करावी. दूतावासातर्फे भाड्याने घेतलेल्या हॉटेल्समध्ये राहणाऱ्यांनी आतच राहावे आणि तेथील दूतावास पथकांच्या नियमित संपर्कात राहावे. सर्वांनी अधिकृत अपडेट्सवर बारकाईने लक्ष ठेवावे.

दूतावासाचे आपत्कालीन मोबाईल क्रमांक:

+९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९

ईमेल: cons.tehran@mea.gov.in

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

"आज रात्री संपूर्ण सभ्यता नष्ट होऊ शकते," असा थेट इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा इशारा दिला. "असे व्हावे अशी माझी इच्छा नसली तरी तसे घडू शकते. आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. तसे व्हावे असे मला वाटत नाही, पण बहुधा ते होईलच," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. "आजची रात्र जागतिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक असेल; कारण ४७ वर्षांची खंडणी, भ्रष्टाचार आणि मृत्यूचा आज अखेर अंत होईल," असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

इराणचे प्रत्युत्तर, सर्व संपर्क तोडले

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर इशाऱ्यानंतरही इराण झुकलेला नाही. त्यांनी अमेरिकेसोबतचे सर्व राजनैतिक आणि अप्रत्यक्ष संवादाचे मार्ग पूर्णपणे बंद केले आहेत. सर्व प्रकारच्या संदेशांची देवाणघेवाणही थांबवण्यात आली असल्याचे 'तेहरान टाइम्स'ने म्हटले आहे. दरम्यान अमेरिकेच्या इशाऱ्याची डेडलाइन संपण्याआधीच इराणकडून हल्ला करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numb hands while sleeping: झोपेतून उठल्यावर तुमचे हात सुन्न पडतायत? वाचा तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय?

Crime: धक्कादायक! कुऱ्हाडीनं वार करत घेतला बायको अन् 8 वर्षाच्या चिमुकलीचा जीव

Maharashtra News Live Update: नगर-पुणे महामार्गावर दारूच्या ट्रकचा थरारक अपघात

IAS transfers : महाराष्ट्राच्या प्रशासनात 'बदली' वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

Doctor death case: डॉक्टर मैत्रिणीला भेटायला रात्री फ्लॅटवर गेला, बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला; तरुण डॉक्टरचा मृत्यू, हातावरील एका खूणेने संशय वाढला

SCROLL FOR NEXT